व्यवसाय म्हटले म्हणजे सगळ्यात पहिले डोक्यात येणारी गोष्ट म्हणजे त्याला लागणारी गुंतवणूक व उत्पादित मालाला असणारी बाजारपेठेत मागणी या दोन्ही गोष्टींवर व्यवसायाचे यश अवलंबून असते. व्यवसायामध्ये नवीन येणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात एकच विचार असतो तो म्हणजे कमीत कमी गुंतवणुकीत चांगला नफा किंवा चांगली मागणी असणारा व्यवसायाची निवड हा होय. तसे पाहायला गेले तर व्यवसाय भरपूर असतात.
त्यात जास्त गुंतवणूक लागणारे, मोठ्या आवाक्याचे व्यवसाय व कमीत कमी गुंतवणूक व चांगला नफा मिळवून देणारे छोटेसे व्यवसाय देखील खूप फायद्याचे असतात. छोट्या व्यवसायाच्या बाबतीत विचार केला तर खूप मोठी यादी तयार होईल इतके व्यवसाय यामध्ये येतात.
परंतु बऱ्याचदा सगळ्या व्यवसायांच्या यादीमध्ये निवड करताना गोंधळ उडतो. म्हणूनच विविध लेखांच्या माध्यमातून व्यवसाय कल्पना देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आजही या लेखात आपण अशाच एका उत्तम मागणी असणाऱ्या चांगला व्यवसाय बद्दल माहिती घेणार आहोत.
फरसाणच बनविण्याचा व्यवसाय
आता फरसाण अर्थात नमकीन यावरून तुम्हाला कळलेच असेल की मागणी कोणत्या पद्धतीची राहू शकते. कारण फरसाणचा विचार केला तर प्रत्येक घरात सकाळचा नाश्ता तर संध्याकाळचा स्नॅक्स मध्यंतरीच्या कालावधीत नॉर्मल पोटाला भर म्हणून देखील फरसाण आवडीने खाल्ले जाते.
हा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे फार मोठ्या जागेची आवश्यकता नसते. तीनशे ते चारशे चौरस फूट जागा राहिली तरी पुरेसे ठरते. त्यापेक्षा तुमच्या घरामध्ये एखाद्या खोलीमध्ये किंवा भागातून हा व्यवसाय सुरू करू शकतात.
छोट्या स्तरावर सुरुवात करून मोठ्या स्तरापर्यंत हा व्यवसाय नेणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला काही रजिस्ट्रेशन गरजेचे असतात. जसे कि फूड लायसन्स आणि एफएसएसएआय चे रजिस्ट्रेशन आवश्यक असते.
यंत्रसामग्रीची आणि इतर आवश्यक गोष्टी
कुठलेही उत्पादन करण्याच्या अगोदर कच्चामाल आवश्यक असतो. याशिवाय तुमचा व्यवसाय सुरु होऊ शकत नाही. आता फरसाण बनवण्याचा व्यवसाय करायचा म्हटले म्हणजे कच्च्या मालात शेंगदाणे, विविध मसाले, बेसन, बटाटे तसेच तेल आणि डाळी यांचा समावेश करता येईल व काही छोटेसे यंत्र देखील तुम्हाला यामध्ये लागतील.
अंदाजे आर्थिक स्वरूप
जर हा व्यवसाय उभारणीचा खर्चाचा विचार केला तर कमीत कमी दोन लाखापर्यंत आणि जास्तीत जास्त म्हणजे मोठ्या स्तरावर करायचा असेल तर सात ते आठ लाख रुपये पर्यंत खर्च अपेक्षित आहे. परंतु या मधून मिळणारा मार्जिन म्हणजेच नफाचा विचार केला तर तुम्ही 25 ते 30 टक्क्यांपर्यंत नफा मिळवू शकतात.
म्हणजेच आठ लाख गुंतवणुकीला 30 टक्के नफा म्हणजेच एका महिन्यात दोन लाख 40 हजार आर्थिक उत्पन्न याच्यात मिळू शकते.
परंतु अगदी सुरुवातीला कुठलाही व्यवसायाला वेग पकडण्यासाठी थोडा अवधी लागतो. त्यासाठी तुमच्या मालाचा दर्जा आणि तुमची मार्केटिंग कौशल्यावर सगळे व्यवसायाचे यश अवलंबून असते.
एकदा तुमचे उत्पादन लोकांच्या नजरेत व लोकांच्या मनात भरले तर जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळणे याच्यामध्ये सहज शक्य आहे. त्यासोबतच या व्यवसायामध्ये असलेली जोखीम त्या मानाने खूपच कमी आहे.
Published on: 04 September 2022, 03:18 IST