ज्यूट म्हणजे ताग, या तागापासून बनवलेले पोते किंवा बारदाना हा प्रामुख्याने कांदा भरनेसाखर व धान्य साठवण्यासाठी लाखोच्या संख्येने लागतात. शेतकरी तसेच कारखानदार तयार मालबाजारपेठेत पाठवताना या बॅगचा पॅकेजिंग मध्ये वापर करतात.
सध्या सरकारने प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध आणल्यामुळे ताग उत्पादनाला मागणी वाढत आहे. हे उत्पादन पर्यावरण पूरक असल्याकारणाने यास बाहेरच्या देशातही मोठी मागणी असते.
ताग गोणी तयार करताना वेगवेगळ्या प्रकारच्या कापडाचा वापर करतात. जसे कांद्यासाठी पातळ कापड वापरले जाते. तर साखर किंवा इतर धान्य साठवणुकीची पोते तयार करण्यासाठी जाड कापड वापरात येते, हे कापड आपणास किलो किंवा मीटर मध्ये बाजारात मिळते ते आपण कापून हाताने किंवा मशीनच्या सहाय्याने शिवून पोते तयार करू शकतो.
- भांडवल गुंतवणूक :- 3 ते 5 लाख
- लागणारा कच्चामाल :- ज्या प्रकारच्या गोण्या किंवा पोती तयार करायचे तसे हलके, मध्यम किंवा जाड कापड वते शिवण्यासाठी सुतळी.
- कच्चामाल मिळण्याचे ठिकाण :- हा कच्चामाल प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्यालगतच्या राज्यात मिळतो जसे पश्चिम बंगाल (कोलकाता)तामिळनाडू मुंबई इ. आपण इंडियामार्ट च्या वेबसाईट वरून मालपुरवण्याचे पत्ते व फोन नंबर देऊ शकता.
- मशिनरी :- कपडे कापण्यासाठी कटिंग मशीन आणि गोणी शिवण्यासाठी शिलाई मशीन, यामध्ये आपण कांदा गोणी हाताने शिवू शकतो. त्यामुळे सुरुवातीचे मशीन विकत घेण्यासाठी लागणारे भांडवल वाचेल.
- मशिनरी किंमत :- यामध्ये वेगवेगळी क्षमता असलेल्या मशिनी असतात. त्यामुळे आपल्या गरजेनुसार मशीन विकत घ्यावी.
- मनुष्यबळ :-10 ते 25 मशीन कामासाठी मनुष्यबळ कमी लागेल.
- विक्री कशी कराल :- शेतकरी, कारखानदार यांना डायरेक्ट सप्लाय. रिटेल दुकानांना पोहोच मालदेऊन त्याच्या माध्यमातून विक्री करावी.
( स्त्रोत-उद्योग आयडिया)
Published on: 13 March 2022, 02:58 IST