Agriculture Processing

यावर्षी केळीला चांगला भाव मिळत असून केळी उत्पादकांना खूप चांगला दिलासा मिळाला आहे.परंतु इतर वेळेस आपण पाहतो की, केळी ही खूपच कमी भावात विकली जाते त्यामुळे शेतकरी राजाचे खूप नुकसान होते. त्यामुळे अशी परिस्थिती जेव्हा येते त्यावेळेस जर केळी उत्पादकांनी केळी विकून पैसा मिळवण्यापेक्षा त्यावर काही प्रक्रिया करून तयार प्रक्रियायुक्त पदार्थ विकले तर नक्कीच जास्तीचा नफा मिळवता येणे शक्य आहे.

Updated on 31 July, 2022 11:46 AM IST

यावर्षी केळीला चांगला भाव मिळत असून केळी  उत्पादकांना खूप चांगला दिलासा मिळाला आहे.परंतु इतर वेळेस आपण पाहतो की, केळी ही खूपच कमी भावात विकली जाते त्यामुळे शेतकरी राजाचे खूप नुकसान होते. त्यामुळे अशी परिस्थिती जेव्हा येते त्यावेळेस जर केळी उत्पादकांनी केळी विकून पैसा मिळवण्यापेक्षा त्यावर काही प्रक्रिया करून तयार प्रक्रियायुक्त पदार्थ विकले तर नक्कीच जास्तीचा नफा मिळवता येणे शक्य आहे.

नुसती केळी विकण्यापेक्षा त्यापासून तयार पदार्थ विकले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न नक्कीच वाढणार आहे यात शंकाच नाही. या लेखात आपण कच्चा केळी पासून पावडर तयार कशी करतात हे जाणून घेणार आहोत.

नक्की वाचा:Pickle Making Bussiness: गुंतवा दहा हजार कमवा महिना 25 ते 30 हजार, वाचा सविस्तर माहिती

कच्चा केळी पासून अशी तयार करावी केळी पावडर

1- यासाठी हिरवी केळीला दहा ग्रॅम सोडियम हायपो क्लोराईट द्रावण देणे गरजेचे असून सोबतच एक ग्रॅम सायट्रिक ऍसिड एक लिटर पाण्यामध्ये पाच मिनिटे बुडवावे.

2- ही प्रक्रिया झाल्यानंतर केळीचे 5 मिमीचे तुकडे करावे व नंतर ते तुकडे तयार द्रावणात बुडवाव्यात. ज्यामुळे यांचा यंझामॅटिक ब्राऊनिंग होत नाही. यानंतर केळीचे जे काप असतात ते काप 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत कोरडे होण्यासाठी 24 तासांसाठी मायक्रो ओव्हन मध्ये ठेवावी. जोपर्यंत केळीचे तुकडे पूर्णपणे कोरडे होत नाही तोपर्यंत तुम्हास त्यांची काळजी घ्यावी लागते.

नक्की वाचा:Processing Unit: गोड ज्वारीपासून तयार करा 'हा' पदार्थ,व्हाल उद्योजक आणि कमवाल बक्कळ नफा

3- नंतर हे काप ब्लेंडर आणि मिक्‍सरच्या साह्याने बारीक करून घ्यावेत. त्यांची पूर्ण पावडर होईपर्यंत ही प्रक्रिया करावी. नंतर ही तयार झालेली पावडर पॉलिथिनच्या पिशव्यांत तसेच शिश्याच्या बाटल्यांमध्ये पॅक करून 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानात ठेवावेत. ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर  पावडर तयार होते. या केळीच्या तयार पावडरी ला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते व या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

काय होतो या केळी पावडरीचा उपयोग?

1- डायबेटिस तसेच रुदय रोग, त्वचेसाठी उपयुक्त आहे तसेच पचनशक्ती मजबूत करणे, वजन कमी करणे आणि वाढविणे यासाठी केळीची पावडर खूप फायद्याचे ठरते. शेतमालाचे आयात सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कंपन्यांची नोंदणी करून तुमची पावडर योग्यप्रकारे विकू शकतात.

नक्की वाचा:Agri Bussiness Tips: युवकांनो! शेतीआधारित करा 'हे' उद्योग,मिळेल नफा अन होईल आर्थिक प्रगती

English Summary: making banana powder is so profitable bussiness for farmer
Published on: 31 July 2022, 11:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)