Agriculture Processing

शेंगदाण्यापासुन विविध पदार्थांची निर्मिती पौष्टिक गुणधर्मामुळे शेंगदाण्यापासुन बनविलेल्या विविध पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.चिक्की,लाडू, चटणी या लोकप्रिय पदार्थांसोबतच शेंगदाण्यापासुन बनवलेल्या लोणी, तेल, पेस्ट, पीठ, पेय, स्नॅक्स आणि चीज या पदार्थांना देखील मागणी वाढू लागली आहे.त्यामुळे शेंगदाणा प्रक्रिया उद्योगात चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Updated on 01 March, 2022 12:44 PM IST

शेंगदाण्यापासुन विविध पदार्थांची निर्मिती पौष्टिक गुणधर्मामुळे शेंगदाण्यापासुन बनविलेल्या विविध पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.चिक्की,लाडू, चटणी या लोकप्रिय पदार्थांसोबतच शेंगदाण्यापासुन बनवलेल्या लोणी, तेल, पेस्ट, पीठ, पेय, स्नॅक्स आणि चीज या पदार्थांना देखील मागणी वाढू लागली आहे.त्यामुळे शेंगदाणा प्रक्रिया उद्योगातचांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

  • प्रक्रियायुक्त पदार्थ:
  • शेंगदाणा दूध :-शेंगदाणे भाजून घ्यावे व गरम पाण्यामध्ये 5-10 मिनटे भिजवावेत. भिजलेल्या शेंगदाण्याची साल काढून ते दोन टक्के खायच्या सोड्याच्या द्रावणामध्ये बारा तास भिजत ठेवावेत. नंतर भिजलेले शेंगदाणे स्वच्छ पाण्याने धुऊन त्यामध्ये 1:5 या प्रमाणात पाणी घालून ग्राइंडर च्या साह्याने बारीक करून घ्यावेत.हे मिश्रण सुती कापडाने गाळून त्यामध्ये व्हेपावडर घालून मिश्रण ढवळून घ्यावे. व दहा मिनिटे गरम करावे. अशा प्रकारे शेंगदाणा दूध तयार करता येते.
  • लोणी  (पिनर बटर):- चांगल्या प्रतीचे 100 ग्रॅम शेंगदाणे घेऊन स्वच्छ करून मंद आचेवर भाजून घ्यावेत. भाजलेल्या शेंगदाण्याची साल  काढून ती ग्राइंडर मध्ये लोण्यासारखा पोत येईपर्यंत बारीक करावेत. हे करत असताना त्यामध्ये 10 ग्रॅम मीठ 20 ग्रॅम मधतसेच स्टॅबिलायझर मिसळावे. तयार झालेले बटर थंड करून काचेच्या बाटल्यांमध्ये भरून साठवावे.
  • चिक्की :- चांगल्या दर्जाचे शेंगदाणे कढईत मंद आचेवर भाजून घ्यावेत.शेंगदाण्याचेबाह्य आवरण काढून त्याचे दोन भाग करून घ्यावेत. 100 ग्रॅम शेंगदाण्या साठी 50 ग्रॅम गूळ हे प्रमाणात वापरून कढईत गूळ घेऊन तो पूर्ण वितळून घ्यावा.वितळलेल्या  मिश्रणात शेंगदाणे घालून शक्य तितक्या वेगाने ढवळावे. या मिश्रणात थोड्या प्रमाणात द्रवरूप ग्लूकोज घालावी. व गरम झाल्यावर गॅस बंद करावा. तूप लावलेल्या प्लेटमध्ये मिश्रण टाकून ते प्लेटवर पसरावे आणि थोडी गरम असताना हव्या तशा आकारामध्ये कापावे कापलेली चिक्की पॉलिथिन बॅगमध्ये पॅक करून साठवावी.
  • शेंगदाणा लाडू :-100 ग्रॅम भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून घ्यावी.50 ग्रॅम गूळ बारीक चिरून घ्यावा. शेंगदाणे आणि गुळ ग्राइंडर मध्ये घालून बारीक करून त्या मिश्रणामध्ये चवीनुसार वेलची पावडर घालावी.मिश्रणात 10 ग्रॅम साजूक तूप घालून त्याचेहवे त्या आकाराचे गोल करून घ्यावेत. बनवलेले शेंगदाणा लाडू काचेच्या बरणीत साठवावेत.
  • शेंगदाणा चटणी :-चांगल्या दर्जाचे शेंगदाणे स्वच्छ करून मंद आचेवर भाजून त्याचे बाह्य आवरण काढून घ्यावे. भाजलेले शेंगदाणे ग्राइंडर मध्ये मीठ, मिरची, लसूण टाकून जाडसर बारीक करावेत. बनवलेली चटणी पॉलिथिन बॅग मध्ये साठवून ठेवावी
  • शेंगदाणा पिठ :- तेल काढल्यानंतर डिफॅटेड शेंगदाणे दळून शेंगदाणा पीठ तयार करतात. शेंगदाणा पीठ हे प्रथिनांनी परिपूर्ण असते. त्यामुळे शेंगदाणापीठ प्रथिनांचा स्रोत म्हणून सामान्यत: सूप, कुकीज, ब्रेड बनविण्यासाठी वापरले जाते. हे मांस उत्पादनाच्या कोटिंगसाठी देखील  वापरले जाते.
English Summary: make various substane from groundnut by processing and get more profit
Published on: 01 March 2022, 12:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)