Agriculture Processing

लसूण हा पदार्थ आपल्याला सर्वांना परिचित असा आहे. स्वयंपाक घरामध्ये लसूण असल्याशिवाय पूर्णत्व येत नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म असून अन्न पदार्थाची चव वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच लसूण हा विविध जीवनसत्त्वांनी युक्त तसेच आणि तंतुमय घटक असलेला पदार्थ आहे. या उपयुक्त अशा लसना पासून प्रक्रिया करून अनेक प्रकारचे मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. या लेखामध्ये आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत.

Updated on 24 August, 2021 2:42 PM IST

 लसूण हा पदार्थ आपल्याला सर्वांना परिचित असा आहे. स्वयंपाक घरामध्ये लसूण असल्याशिवाय पूर्णत्व येत नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म असून अन्न पदार्थाची चव वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच लसूण हा विविध जीवनसत्त्वांनी युक्त तसेच आणि तंतुमय घटक असलेला पदार्थ आहे. या उपयुक्त अशा लसना पासून प्रक्रिया करून अनेक प्रकारचे मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. या लेखामध्ये आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत.

  • लसूण सॉस:

लसूण सॉस तयार करण्यासाठी सर्वप्रथम 100 ग्रॅम लसणाच्या पाकळ्या घ्याव्यात. 250 मिली थंड दूध तसेच पाचशे मिली तेल आणि लिंबाचा चार चमचे रस व अर्धा चमचा मीठ यासाठी लागते.

यासाठी प्रथम लसूण पूर्णपणे सोलून घ्यावा व सोललेल्या लसणाच्या पाकळ्या मध्ये अर्धा चमचा मीठ व निम्मे दूध घालून हे मिश्रण मिक्सर मधून व्यवस्थित फिरवून घ्यावे. हे फिरून झाल्यानंतर  उरलेले दूध त्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यावे.हे सगळे तयार झालेले मिश्रण पुन्हा दोन मिनिटांसाठी मिक्सर मधून व्यवस्थित फिरवून घ्यावी.नंतर या मिश्रणामध्ये लिंबाचा रस टाकावा व तो चांगल्या प्रकारे मिसळून पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यावा. अशाप्रकारे स्वास तयार होतो. हा तयार सॉसव्यवस्थितपणे बरणीमध्ये हवाबंद करून ठेवावा.

  • लसणाची जेली:

लसणाची जेली तयार करण्यासाठी 100 ग्रॅम सोललेला लसूण तसेच पाचशे मिली विनेगर एक किलो साखर तसेच 100 मिली पेक्टीन घ्यावे.

जेलीतयार करताना सगळ्यात अगोदर विनेगर व लसणाच्या पाकळ्या एकत्र कराव्यात. त्यांना मऊ होईपर्यंत ब्लेंडर च्या साह्याने एकजीव करावे. नंतर हे एकजीव झालेले मिश्रण पॅनमध्ये काढून उरलेले व्हिनेगर व साखर एकत्र करून घ्यावे. या एकत्रित मिश्रणास मंद आचेवर उकळी द्यावी.हे मिश्रणउष्णता  देत असताना ते करपणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. या मिश्रणामध्ये पेक्टिन मिसळून पुन्हा उकळी द्यावी. अशाप्रकारे लसणाची जेली तयार होते.  ही तयार झालेली निर्जंतुक बरण्यांमध्ये  व्यवस्थित भरून ठेवावी.

  • लसुन ( गार्लिक) सॉल्ट :

गार्लिक सॉल्ट तयार करण्यासाठी 20 ग्रॅम लसूण पावडर,  78 ग्राम बीट व कॅल्शियम स्टीअरेटदोन ग्रॅम इत्यादी साहित्याची आवश्यकता असते.

सगळ्यात आगोदर कॅल्शियम स्टीअरेट,लसूण पावडर आणि मीठ एकत्र करून घ्यावे. वर दर्शविलेली प्रमाण हे 100 ग्रॅम गार्लिक सॉल्ट बनवण्यासाठी चे आहे. गार्लिक सॉल्ट चा उपयोग पदार्थांना चव आणण्यासाठी केला जातो.

  • लसुन ज्यूस:

लसुन ज्युस तयार करण्यासाठी सगळ्यात प्रथम वाळलेल्या लसणाच्या अंदाजे चार मी आकाराच्या गोल चकत्या करून घ्याव्यात. या तयार केलेल्या चकत्या मऊ होण्यासाठी गरम पाण्यामध्ये ठेवाव्यात. या मऊ झालेल्या लसूण चकत्यांचे  बारीक तुकडे करावेत.त्याची पातळसर पेस्ट तयार करावी. तयार पेस्ट एका सुती कापडामध्ये घेऊन चमच्याने दाबून लसूण ज्युस मिळवता येतो.

 

  • लसूण लोणचे:

लसणाचे लोणचे तयार करण्यासाठी 100 ग्रॅम लसूण, 50 ग्रॅम तेल,अर्धा चमचा हिंग, हळद आणि मेथी चे दाणे पावडर तसेच बडीशेप पावडर, विनेगार 60 मिली व तिखट दोन चमचे इत्यादी साहित्य लागते.

सगळ्यात अगोदर तव्यावर तेल गरम करण्यासाठी ठेवावे. त्यामध्ये एक चमचा हिंग घालून तो घातलेला हिंग फुलल्यानंतर त्यामध्ये सोललेल्या लसणाच्या पाकळ्या व एक चमचा मीठ घालावे. साधारणपणे या पाकळ्या चार ते पाच मिनिटांमध्ये मऊ होतात.त्यानंतर गॅस बंद करूनत्यामध्ये मेथी दाणे पावडर, बडीशेप पावडर व मोहरी पावडर घालून चांगले एकत्र एकजीव करून घ्यावे. त्यानंतर व्हिनेगर मिसळावे.अशाप्रकारे लसणाचे लोणचे तयार होते. हे तयार लोणचे स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हवाबंद करावे.

English Summary: make various processing substance from garlic
Published on: 24 August 2021, 02:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)