आपला देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जात असला, तरी अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. सध्या शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहेत. यामुळे त्यांच्यावर आर्थिक परिस्थिती निर्माण होत आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेती व्यवसायात (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेती (Agriculture) नको असे म्हणू लागले आहेत. यामुळे अनेकजण चार पैशांची का होईना शहरात नोकरीच करताना आता दिसत आहेत.
यामध्ये काळाच्या ओघात बदल केला आणि त्याला शेती पूरक व्यवसायाची सांगड घातली तर निश्चितच शेतकरी बांधवांना लाखों रुपयांचा फायदा होती. अनेकांना चांगली शेती पाणी असूनही ते शेती करत नाहीत. मात्र काहीजण कमी शेतीमध्ये देखील चांगले उत्पादन घेतात. आता असाच एक व्यवसाय करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. हा व्यवसाय अतिशय कमी भांडवलात सुरु करता येतो.
यामधून लाखो रुपयांची कमाई देखील यातून होते. हा व्यवसाय म्हणजे कडकनाथ कोंबडी पालनाचा आहे. आपल्या देशात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय एम.पी. आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. आदिवासी भागात कडकनाथला कालीमासी असे म्हणतात. हा कोंबडा पूर्णपणे काळा असतो. यामधून आता अनेकजण लाखो रुपये कमवू लागले आहेत.
याचे अनेक फायदे आहेत, कडकनाथ कोंबडीचे मांस आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे मोठी मागणी आहे. यामुळे कडकनाथ पालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. महाराष्ट्रात देखील कडकनाथ पालन आता होत आहे. राज्यातील शेतकरी बांधव हळूहळू कडकनाथ पालनकडे वळू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना हा एक चांगला पर्याय आहे.
कडकनाथ कोंबडा, कोंबडीचा रंग काळा असतो, याचे मांस देखील काळे असते आणि रक्त देखील काळे असते. या मांसामध्ये लोह आणि प्रथिने सर्वाधिक आढळतात. या मांसात फॅट म्हणजेच चरबी आणि कोलेस्टेरॉलही कमी प्रमाणात आढळते. हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही कोंबडी अतिशय फायदेशीर मानली जाते. कडकनाथ कोंबड्याला मोठी मागणी असते शिवाय बाजारात भाव देखील अधिक असतो. यामुळे हा जोडव्यवसाय फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या;
बंडखोर म्हणत होते अजितदादा निधी देत नव्हते, दादांनी सगळ्यांसमोर आकडेवारीच सांगितली
वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत त्यांनी 14 तलाव खोदले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले कौतुक..
Published on: 04 July 2022, 03:34 IST