Agriculture Processing

Onion Business:- अनेक प्रकारच्या व्यवसायांचा विचार केला तर यामध्ये कांद्याचा होलसेल व्यवसाय हा खूप फायद्याचा ठरू शकतो. अनेक बाबींची जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊन हा व्यवसाय सुरू केला तर या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधने फार काही कठीण नाही. तुम्ही शेती करून देखील हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतात. परंतु हा व्यवसाय करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. या बारीक सारी बाबी जर तुम्ही या व्यवसायामध्ये व्यवस्थित मेंटेन केल्या तर नक्कीच तुमच्यासाठी खूप फायद्याचे होऊ शकतो.

Updated on 06 August, 2023 9:39 PM IST

Onion Business:- अनेक प्रकारच्या व्यवसायांचा विचार केला तर यामध्ये कांद्याचा होलसेल व्यवसाय हा खूप फायद्याचा ठरू शकतो. अनेक बाबींची जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊन हा व्यवसाय सुरू केला तर या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधने फार काही कठीण नाही. तुम्ही शेती करून देखील हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतात. परंतु हा व्यवसाय करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. या बारीक सारी बाबी जर तुम्ही या व्यवसायामध्ये व्यवस्थित मेंटेन केल्या तर नक्कीच तुमच्यासाठी  खूप फायद्याचे होऊ शकतो.

सर्वप्रथम कांद्याचा व्यवसाय सुरू करण्याची पद्धत

 कांद्याचा होलसेल विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्हाला कांदा कुठून खरेदी करायचा आणि विकायचा आहे हे अगोदर  लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच कांदा खरेदी नंतर त्याची साठवण करता यावी याकरिता एखाद्या दुकान किंवा गोदाम तुम्हाला लागते. एखाद्या भाजी मार्केट जवळ जर तुम्ही जागा पाहिली तर हा व्यवसाय खूप व्यवस्थित चालू शकतो. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्या अगोदर बाजारपेठेच्या जवळचे ठिकाण पहाणे खूप गरजेचे आहे.

तसेच लग्न किंवा इतर समारंभांमध्ये देखील कांद्याचा वापर केला जातो. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे आयोजन करणारे जे काही व्यक्ती किंवा स्वयंपाकी असतात त्यांच्यापर्यंत तुमचा संपर्क ठेवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसाय तुम्ही साधारणपणे दोन प्रकारे सुरू करू शकतात. जे सर्व प्रकारे शेतकरी करतात. स्वतःच्या शेतात कांदा पिकवून तो विक्री करणे आणि दुसरा प्रकार म्हणजे घाउक कांद्याचा व्यवसाय होय. यामध्ये तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडून कांदा विकत घेऊन तो छोट्या दुकानदारांना होलसेल मध्ये विक्री करू शकता.

 बाजार संशोधन महत्वाचे

 कांद्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला बाजाराचे संशोधन करणे गरजेचे असून यामध्ये जागेची निवड तसेच तुमच्या आजूबाजूला राहत असलेली लोकसंख्या इत्यादी बाबी डोळ्यासमोर ठेवून दिवसाची सुरुवात करावी. तसेच तुमच्या दुकानापासून किंवा ज्या ठिकाणाहून तुम्ही कांदा विक्री करणार आहात त्या ठिकाणाहून कांदा खरेदीचे ठिकाणाचे अंतर पाहणेदेखील महत्वाचे आहे.

कांद्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कांदा खरेदी करणे गरजेचे आहे. जेव्हाही तुम्ही शेतकऱ्याकडून कांदा खरेदी कराल तेव्हा तो तुम्हाला सुट्टा मिळेल.हा सुट्टा कांदा विकत घेतल्यानंतर तुम्हाला गोण्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये व्यवस्थित वजन करून पॅक करणे गरजेचे आहे.

 पॅकेजिंग महत्वाची

 तुम्ही जर तुमच्या कांद्याची पॅकिंग एकदम आकर्षक आणि व्यवस्थित केली तर त्याचा विक्रीवर खूप सकारात्मक परिणाम दिसून येतो. पॅकिंग साठी तुम्ही गोण्या वापरू शकता व गोणी व्यवस्थित शिवून सीलबंद करून त्याची विक्री करू शकतात.

 कामगारांची आवश्यकता

 एकटा माणूस कांद्याचा होलसेल व्यवसाय करू शकत नाही. खरेदी केलेला कांदा  स्वच्छ करणे तसेच त्याची शॉर्टिंग करण्यासाठी तुम्हाला मजुरांची आवश्यकता भासते. तसेच खरेदी केलेला कांदा वाहनांमध्ये चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी देखील मजूर लागतील. पुढे आवश्यकतेनुसार कामगारांची निवड देखील महत्त्वाचे ठरते.

 होलसेल कांदा व्यवसायासाठी आवश्यक परवाना आणि नोंदणी

 कांद्याचा होलसेल व्यवसाय सुरू करण्याकरता तुम्हाला नोंदणीची आवश्यकता भासत नाही. परंतु जर तुमच्या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर 25 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जीएसटी मध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे.

किती लागेल गुंतवणूक आणि नफा

 वाहनांव्यतिरिक्त तुम्हाला कांदा चा होलसेल व्यवसाय सुरू करण्याकरिता एक ते दोन लाख रुपये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. परंतु वाहनांची खरेदी करायची असेल तर गुंतवणुकीत वाढ होऊ शकते. जर या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याचा विचार केला तर सुरुवातीला तुम्हाला थोडेसे जास्त प्रयत्न करावे लागतील. 

परंतु काही दिवसांनी व्यवसाय चांगला सुरू झाल्यानंतर तुम्हाला यातून भरपूर पैसा मिळेल. अगदी सुरुवातीला तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर 50 हजार ते साठ हजार रुपये यामध्ये कमाई करू शकता व्यवसायात वाढ होईल तसा तुमचा इन्कम देखील वाढेल.

English Summary: Make lots of profit from onion business! So you have to do these things….
Published on: 06 August 2023, 09:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)