Agriculture Processing

मखाना हे एक जलिय उत्पादन असून तलाव,तळे अशा दलदलीच्या क्षेत्रात उगवते.मखाना जगामध्ये गोरगोननट ड्रायफूट म्हणून ओळखले जाते.मखाना मध्ये पोषकतत्वे असल्याकारणाने आरोग्यासाठी फारच फायदेशीर असते.यामध्ये प्रथिने, कर्बोदके आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी हे फायदेशीर आहे.

Updated on 21 December, 2021 5:49 PM IST

 मखाना हे एक जलिय उत्पादन असून तलाव,तळे अशा दलदलीच्या क्षेत्रात उगवते.मखाना जगामध्ये  गोरगोननट ड्रायफूट म्हणून ओळखले जाते.मखाना मध्ये पोषकतत्वे असल्याकारणाने आरोग्यासाठी फारच फायदेशीर असते.यामध्ये प्रथिने, कर्बोदके आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी हे फायदेशीर आहे.

कमळाच्या पुष्पथाली आणि बियांचा वापर खाण्यासाठी करण्यात येतो. कमळाच्या गड याचा वापर भाजून, तळून किंवा लोणच्यासाठी करण्यात येतो.कमळाला गोल किंवा अंडाकार संत्रा एवढे फळं येतात. या फळात 10 ते 20 कवचयुक्त काळा बि असतात. या बियांना भाजून याचा उपयोग गोड पदार्थ, नमकीन,खीर,बर्फीआणि चिक्की यामध्ये केला जातो.शरीरातील कोलेस्टेरॉल,रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तसेच स्त्रियांसाठीमखाना उपयुक्त आहे. या लेखात आपण मखाना पासून विविध तयार होणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांविषयी माहिती घेऊ.

मखाना पासून बनवण्यात येणारे विविध पदार्थ..

  • मखाना स्नॅक्स किंवा लाह्या- लाह्या तयार करण्यासाठी बिया मातीच्या किंवा बिलाच्या कढईमध्ये भाजले जातात. दोन-तीन दिवस सामान्य तापमानाला ठेवून पुन्हा 250 ते 330अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत भाजले जातात.लाया किंवा स्नॅक्स हे वेगवेगळे मसाले वापरून अनेक प्रकारे बनवता येतात.यासाठी मखाना लाया कढईमध्ये तेल टाकुन भाजुन घ्यावे.त्यामध्ये जिरा पावडर,काळे मीठ,आमचूर,मिरची पावडर टाकून भाजून चविष्ट स्नेक बनवता येते.
  • बर्फी- मखाना ची बर्फी तयार करण्यासाठी मखाना कढईमध्ये तेल किंवा तूप टाकून भाजून त्याची पावडर करून घ्यावी. मखना पावडर 70 ग्रॅम, खोबरा कीस 30 ग्रॅम आणि ड्रायफूट बटर टाकून भाजून घ्यावे.नंतर यामध्ये 60 ग्रॅम साखर टाकूनमिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहावे.मिश्रण घट्ट झाले की तूप लावलेल्या ताटात पसरुन त्याच्या वड्या पाडाव्यात.
  • मखाना पावडर-कढाई मध्ये मखाना बटर टाकुन भाजुन घ्यावा.त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. ही पावडर भाज्या,सूप, लाडू व दुधामध्ये वापरता येते.
  • मखाना खीर- खीर बनवण्यासाठी मखाना तूप टाकून भाजून घ्यावा.गॅस वर दुधामध्ये साखर टाकूनविरघळून घ्यावी. त्यामध्ये ड्रायफूट पावडर आणि मखाना टाकून पाच ते दहा मिनिटे उकळून घ्यावे.
  • चिक्की- चिक्की साठी मखाना भाजून घ्यावा आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे.कढाई मध्ये 50 ग्रॅम गुळाचा एक तारी पाक बनवूनत्यात 100 ग्रॅम बारीक केलेला मखाना टाकून एकजीव करून घ्यावे.हे मिश्रण बटर लावलेल्या फ्लॅटमध्ये पसरून घ्यावे आणि काप पाडावेत.चिक्की चेक अपहवाबंद करून साठवून ठेवावी.अशाप्रकारे पौष्टिक चिक्की बनवण्यासाठी यामध्ये शेंगदाणे, राजगिरा आणि जवस वापरता येते.
English Summary: make a very healthy substance processing by fox nut like as sncks,barfi,kheer etc.
Published on: 21 December 2021, 05:49 IST