Agriculture Processing

समाजात बरेच लोक असे असतात की त्यांना नोकरीपेक्षा छोट्या-मोठ्या व्यवसायात अधिक रस असतो. बरेच लोक छोट्या गुंतवणुक व अधिक नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असतात.

Updated on 25 December, 2020 12:29 PM IST


समाजात बरेच लोक असे असतात की त्यांना नोकरीपेक्षा छोट्या-मोठ्या व्यवसायात अधिक रस असतो. बरेच लोक छोट्या गुंतवणुक व अधिक नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असतात. अशा लोकांसाठी एक छोटासा परंतु अत्यंत फायदेशीर व्यवसायाबद्दल माहिती आम्ही देत आहोत. तो व्यवसाय म्हणजे केळीचे चिप्स बनविण्याचा व्यवसाय. चला तर मग या लेखात संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

   केळीचे चिप्स बनवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी

 केळीचे चिप्स बनवण्यासाठी विविध प्रकारची यंत्रे वापरली जातात. महत्वाचे म्हणजे प्रामुख्याने कच्ची केळी, मीठ, खाद्यतेल आणि काही प्रकारचे मसाले कच्चा माल म्हणून व्यवसायात वापरले जातात.

 

या व्यवसायासाठी लागणारी उपकरणे

1- केळी वाशिंग टॅंक आणि केळी सोलण्याची मशीन

2- केळी कटिंग मशीन

3- फ्रंयिंग  मशीन

4- पाउच प्रिंटिंग मशीन

5- प्रयोगशाळा उपकरणे

 इत्यादी मशिनरीची आवश्यकता या उद्योगासाठी भासते.

 

 

 हे उपकरणे कुठे खरेदी करता येऊ शकता?

 केळीचा चिप्स चा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही https://www.indiamart.com/ किंवाhttps://india.alibaba.com/index.html वरून वरील मशीन खरेदी करू शकता. हे उपकरण ठेवण्यासाठी कमीत-कमी 4000 ते 5000 चौरस फूट जागेची आवश्यकता असते. हे उपकरणे साधारणता आपल्याला 28 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत मिळतात.

 

 50 किलो चिप्स बनवण्यासाठीचा खर्च

 50 किलो चिप्स तयार करण्यासाठी कमीतकमी 120 किलो कच्ची केळी आवश्यक असते. 120 किलो केळीचा खरेदी खर्च सुमारे हजार रुपये असतो. त्यासाठी तुम्हाला 12 ते 15 लिटर खाद्यतेल लागते. तेलाची किंमत 70 रुपये नुसार 1050 रुपये तेलासाठी लागतात. चिप्स फ्रायिंग मशीन एका तासामध्ये 10 ते 11 लिटर डिझेल लागते. एक लिटर डिझेलची किंमत 80 रुपये आहे. 11 लिटरच्या हिशोबाने ते 900 रुपये होतात. मीठ आणि मसाले 3 हजार 200 रुपयांमध्ये तयार होतील. म्हणजे केळाचे चिप्सच्या एका पॅकेटची किंमत पॅकिंगच्या किमतीसह 70 रुपये असेल. जी तुम्ही ऑनलाईन किंवा किराणा दुकानात 90 किंवा 100 रुपये किलोने सहज विकू शकता.या हिशोबाने जर आपण एक किलो पाठीमागे 10 रुपयांचा प्रॉफिट पकडला तर आपण सहजपणे दिवसाला 4 हजार रुपयांचा नफा कमवू शकतो. जर आपली कंपनी एका महिन्यात 25 दिवस काम करत असेल तर आपण एका महिन्यात एक लाख रुपये कमवू शकतो.

English Summary: Make a lot of money by making chips from bananas, find out tools
Published on: 25 December 2020, 12:28 IST