Agriculture Processing

जर तुम्हाला एखादा बिजनेस सुरु करायचा असेल सर आम्ही या लेखामध्ये तुमच्यासाठी एक बिझनेस आयडिया बद्दल माहिती देणार आहोत. ज्या माध्यमातून तुम्ही दिवसाकाठी चार हजार रुपये सहजतेने कमवू शकतात.या व्यवसायाचेखास वैशिष्ट्य आहे की, यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची गरज नाही.

Updated on 09 November, 2021 9:10 PM IST

जर तुम्हाला एखादा बिजनेस सुरु करायचा असेल सर आम्ही या लेखामध्ये तुमच्यासाठी एक बिझनेस आयडिया बद्दल माहिती देणार आहोत. ज्या माध्यमातून तुम्ही दिवसाकाठी चार हजार रुपये सहजतेने कमवू शकतात.या व्यवसायाचेखास वैशिष्ट्य आहे की, यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची गरज नाही.

त्यामध्ये तुम्ही महिन्याला आरामात एक लाख 20 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता.हा व्यवसाय आहे कॉर्नफ्लेक्सहोय.

 कॉर्न फ्लेक्स बिझनेस ( व्यवसाय)

 मका आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग त्याचा विविध प्रकारे उपयोग करण्यात येतो. बऱ्याच कुटुंबांमध्ये सकाळी नाष्टा साठी मक्याचा वापर केला जातो.मका आरोग्यासाठीहीउपयुक्त मानला जातो. चला तर मग जाणून घेऊ या व्यवसायाची सुरुवात कशी करावी?

 हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती जागेची आवश्यकता असते?

 हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याजवळ जमीन असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही या जमिनीवर स्वतःचा प्लांट उभा करू शकतात. त्यासोबतच स्टोरेज साठी सुद्धा जागेची आवश्यकता असते. गोदामासाठी सुद्धा जागेची आवश्यकता लागेल. यासाठी तुमच्या जवळ  2000 ते तीन हजार स्क्वेअर फूट जागा असणे आवश्यक आहे. तसेच या व्यवसायात लागणाऱ्या मशिनरीचा विचार केला तर यामध्ये मशिने, विजेची सुविधा,जीएसटी नंबर, कच्चामाल, स्क्रॅप आणि स्ट्रोक ठेवण्यासाठी गोदामाची आवश्यकता असते.

 हा बिजनेस कुठे करावा?

 या व्यवसायात वापर करण्यात येणारे तंत्रांचा वापर हा केवळ कॉर्नफ्लेक्स बनवण्यासाठी होत नसून गव्हाचे आणि तांदळाचे फ्लेक्स बनवण्यासाठी सुद्धा या यंत्राचा वापर करता येतो. हा व्यवसाय स्थापन करण्यासाठी ज्या क्षेत्रात मका लागवड जास्त असते अशा क्षेत्राची निवड करावी. जर तुम्ही दुरच्या एखाद्या ठिकाणाहून मक्का आणून कॉर्न फ्लेक्स  बनवले तर त्याची किंमत वाढवून ते जास्त महाग होईल. त्यासाठी अशा जागेची  निवड करायला हवी कि, व्यवसायाच्या ठिकाणी चांगल्या प्रतीचा मक्का उपलब्ध होईल.

 यामध्ये किती नफा होतो?

मिडीया अहवालानुसार,एक किलो कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठी कमीतकमी तीस रुपये खर्च येतो.

बाजारामध्ये कॉर्नर फ्लॅक्सची विक्री 70 रुपये प्रति किलोचा हिशोबाने सहजतेने होते.जर तुम्ही 100 किलो कॉर्नफ्लेक्स एका दिवसात विक्री केले तर तुमचा नफाहा जवळ जवळ चार हजार रुपयांपर्यंत असतो. याप्रमाणे हिशोब केला तर एका महिन्यात एक लाख वीस हजार रुपये तुम्ही सहजतेने कमाई करू शकतात.

या व्यवसायासाठी किती रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते?

जर पैसे किती गुंतवायचे याचा विचार केला तर हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. म्हणजे तुम्हाला  कमी क्षमतेचा हा व्यवसाय सुरू करायचा आहे की मोठ्या क्षमतेत यावर गुंतवणूक अवलंबून असते. हा व्यवसाय सुरुवात करण्यासाठी कमीत कमी पाच ते आठ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक आवश्यक असते.

English Summary: make a corn flex buiseness is benificial and low investment bussiness
Published on: 09 November 2021, 09:10 IST