टोमॅटो पिकाचा विचार केला तर जागतिक पातळीवर टोमॅटो उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये सर्वाधिक टोमॅटो हा आंध्र प्रदेश राज्यात पिकतो त्यानंतर बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांचा नंबर लागतो. टोमॅटो काढणी वेळी दरातील चढ-उतार आणि काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा अभाव मुळे टोमॅटोचे पाच ते 50 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. बाजारामध्ये टोमॅटोचे दर घसरले नंतर उत्पादनावर प्रक्रिया केल्यास ही उत्पादने अधिक काळ साठवून बाजारपेठेत आणता येतील. परिणामी शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी होते. या लेखात आपण टोमॅटोवर प्रक्रिया करताना कोणती यंत्रे आवश्यक आहेत, त्याबद्दल माहिती घेणार आहोत.
- ड्रायर:
कोणत्याही अन्नपदार्थातील पाण्याचे प्रमाण हे पदार्थ किती दिवस टिकणार हे ठरते. पदार्थात पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर तो पदार्थ लवकर खराब होतो व जिथे पाणी कमी तितकाच पदार्थ जास्त काळ टिकतो. ड्रायरचा वापर करून पाण्याचे प्रमाण कमी करता येते.
- रिफ्रॅक्टोमीटर:
पदार्थातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. ब्रिक्स गोडी मोजण्याचे एकक आहे. यासाठी सहज हाताळता येईल असे रेफेक्ट्रॉमीटर मीटर बाजारात उपलब्ध आहे. या यंत्राचे वजन 290 ग्रॅम असते व त्याची लांबी 20 सेंटिमीटर असते. यंत्राची किंमत बाराशे पन्नास रुपयांपासून सुरू होतात. या यंत्राद्वारे 30 ते 60 अंश ब्रिक्स पर्यंत गोडी मोजता येते.
- फळे धुण्यासाठी साठी लागणारे यंत्र:
फळांना चिकटून बसलेली धूळ व अन्य प्रदूषक घटक स्वच्छ करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. फळे धुताना कोमट किंवा थंड पाण्याचा वापर केला जातो. हे यंत्र स्टेनलेस स्टील पासून बनलेले असून ते 310 वोल्ट सिंगल फेज वर चालते. त्याची फ्रिक्वेन्सी 50 ते 60 हर्ट इतके आहे. हे यंत्र एका तासामध्ये 200 किलो फळे धुते. 50 हजार रुपये याचे बाजार किंमत आहे.
- पल्पर:
फळांमध्ये असलेला रस आणि गर वेगळा करण्यासाठी पल्पर चा वापर केला जातो. सध्या आपल्याकडे अर्धा एचपी व सिंगल फेज वर चालणारे पल्पर यंत्र बाजारात उपलब्ध आहेत. त्याची क्षमता 50 किलो प्रति तास इतकी आहे. फळांमधील रसाची विविध प्रकारचे घनता मिळवण्यासाठी 0.25 ते आठ मी-मी या आकाराच्या जाळ्या उपलब्ध आहेत. या यंत्राचे सर्व भाग हे स्टेनलेस स्टील पासून बनलेले आहेत व हे यंत्र संपूर्ण स्वयंचलित आहे. या यंत्राची किंमत पंधरा हजार रुपये इतकी आहे.
- पल्वलायझर:
टोमॅटोची भुकटी बनविण्यासाठी याचा वापर होतो. हे यंत्र 2 एचपी क्षमतेचे असून प्रति मिनिट 1440 या वेगाने फिरते. हे उपक्रम स्वयंचलित असून प्रति बॅच 20 ते 22 किलो टोमॅटोवर प्रक्रिया करते. या यंत्राचे सर्व भाग ॲल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टील पासून बनलेले असतात. याची किंमत क्षमतेनुसार असते म्हणजे 14,000 पासुन मार्केट मध्ये मिळते.
- स्टीम जॅकेट कॅटल:
हे उपकरणाचा वापर हा स्वास, सूप गरम करणे, शिजवणे किंवा मिश्रण एकत्रित करण्यासाठी वापरले जाते. कीटलीला दोन थर असतात. त्यातील बाह्य थरांमध्ये पाण्याची वाफ सोडली जाते. वाफेच्या उष्णतेने आतील पदार्थ शिजवला जातो. याची तापमान साधारणपणे 100 अंश सेल्सिअस पर्यंत राहते. पदार्थ थंड करण्यासाठी याला एक जॅकेट जोडलेले असते. त्यामध्ये थंड पाणी सोडून पदार्थाचे तापमान कमी केले जाते. यामध्ये पन्नास लिटर पासून तीन हजार लिटर पर्यंतच्या क्षमता उपलब्ध आहे. हे उपकरण अर्ध स्वयंचलित असून सिंगल फेज विद्युत प्रणाली किंवा गॅस वर चालते. याच्या किमती 50 हजारांपासून पुढे आहेत.
Published on: 13 July 2021, 11:17 IST