Agriculture Processing

महाराष्ट्र मध्ये विविध प्रकारच्या फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने महाराष्ट्राला भारताची फळांची टोपी असे संबोधले जाते. परंतु काढणीनंतर च्या चुकीच्या हाताळणीमुळे व प्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रक्रिया हा एक त्यावरील रामबाण उपाय आहे. महाराष्ट्राच्या अवर्षण प्रवण भागांमध्ये जांभूळ फळांचे उत्पादन भरपूर होते. परंतु प्रक्रियेच्या अभावामुळे त्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. म्हणून त्यावरील प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थ तयार करून शेतकऱ्यांनी व महिला बचत गटाने त्याची विक्री व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास निश्चित फायद्याचे ठरते. तसंच त्यातून ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती देखील होण्यास मदत होईल. या लेखात आपण जांभूळ प्रक्रिये मधील संधी आणि प्रक्रियायुक्त पदार्थ याबद्दल जाणून घेणार आहोत.

Updated on 22 June, 2021 7:11 PM IST

 जांभूळ प्रक्रियेच्या संधी

 जांभळाच्या पिकलेल्या फळांमध्ये आहार मूल्य व औषधी गुणधर्म चांगले असल्याने फळांना बाजारपेठेत फार चांगली मागणी असते. ही फळे अत्यंत नाजूक व नाशवंत असल्याने एक ते दोन दिवसांपेक्षा जास्त काळ साठवता येत नाहीत. बाजारात एकाच वेळी फळांची आवक जास्त झाली की त्याचे दर कोसळतात व शेतकऱ्यांना त्याचा माल पडेल त्या भावाला विकल्याने  त्याचा तोटा होतो. यासाठी जांभूळ फळांपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यास औषधी गुणधर्माचा वापर होईल. हंगाम नसताना फळांचा आस्वाद घेता येईल असे प्रक्रिया उद्योग खेडोपाडी उभारल्यास रोजगार निर्मिती होऊ शकेल. या फळापासून आपण रस, सरबत, स्क्वॅश, सिरफ, वाईन, जेली, बर्फी टॉफी, पावडर इत्यादी पदार्थांना  बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

 विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

  • जांभळाचे सरबत

प्रथम पिकलेली व आकाराने आणि मोठी फळे निवडावीत. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर जांभळी पल्पर  च्या साह्याने त्याचा रस काढून घ्यावा. एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 82 हाऊस सेंटीग्रेड तापमानाला 20 मिनिटे गरम करावा. यामुळे रस्सा मधील रंग द्रव्याचे प्रमाण जास्त मिळते. रसामध्ये साखर, सायट्रिक ऍसिड, पाणी व परिरक्षक योग्य प्रमाणात घेऊन  रसामध्ये मिसळून ते मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर हे मिश्रण थोडा वेळ गरम करून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांत भरून  हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरड्या जागेवर साठवून ठेवावे.

 जांभळा गर एक लिटर, साखर एक किलो, पाणी चार लिटर, सायट्रिक ऍसिड दोन ग्रॅम

  • जांभळाचे स्क्वॅश

 जांभळाच्या फळांपासून स्क्वॅश तयार करण्यासाठी प्रथम पिकलेल्या निरोगी चांगल्या फळांची निवड करावी. फळे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर पल्पर च्या साह्याने त्याचा रस काढून घ्यावा. एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 80 ते 82 अंश सेंटिग्रेड तापमानाला तीस मिनिटे गरम करावा.

यामुळे रस्सा मधील रंग द्रव्याचे प्रमाण जास्त मिळते. रसामध्ये साखर, सायट्रिक ऍसिड, पाणी व परिरक्षक योग्य प्रमाणात घेऊन रसामध्ये मिसळून हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर हे मिश्रण थोडेसे गरम करून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीत हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरड्या जागेवर साठवून ठेवावे.

जांभळाचा रस एक लिटर,साखर एक किलो, पाणी चार लिटर, सायट्रिक ऍसिड दोन ग्रॅम

  • जांभळाच्या बियांचे पावडर

जांभळाच्या फळांपासून गर व रस काढल्यानंतर राहिलेल्या बियांपासून पावडर तयार करता येते. ही पावडर मधुमेही रुग्णांसाठी अत्यंत गुणकारी असते. त्या पावडरला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गर काढून घेतल्यानंतर राहिलेल्या बिया पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. त्या बिया ट्रेमध्ये पातळ पसरून ते ट्रे ड्रायरमध्ये 55 ते 60 अंश सेंटिग्रेड तापमानास 18 ते 20 तास ठेवावेत  व उन्हात वाळवावेत. वाळलेल्या बिया मिक्सर किंवा ग्राइंडर च्या मदतीने पावडर तयार करावी. नंतर पावडर चे वजन करून पॉलिथिनच्या पिशवीत भरून पिशव्या हवाबंद करून लेबल लावून कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

English Summary: janbhul procesing
Published on: 22 June 2021, 07:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)