शेतकरी आपल्या शेतात अनेक वेगवेगळे प्रयोग करत असतात. यामध्ये काहीदा यश मिळते तर काहीदा त्यांना अपयश मिळते. तसेच अनेकजण मधमाशी पालनाद्वारे मोठ्या प्रमाणावर पैसे कमवता, आणि आपली वेगळीच ओळख निर्माण करतात. असे असताना आता यामुळे एका गावाचे नाव देश पातळीवर गाजले आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एका गावाला मधाचे गाव असं घोषित करण्यात आलं आहे.
याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे ‘मधाचे गाव’ म्हणून देसाई यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आले आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचं बोलले जात आहे. मांघर येथील ‘मधाचे गाव’ प्रकल्प हा अशा प्रकारचा देशातील पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील असे प्रकल्प राबवण्यात येतील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.
या गावातील 80 टक्के लोकांची उपजीविका ही या मधाच्या उद्योगावर अवलंबून आहे. यामुळे येथील सर्व गोष्टींमध्ये मधाचा समावेश असतोच. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्थेत मधमाशी पालनाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने प्रकल्प मधमाशी राबवून त्याअंतर्गत मांघर या पहिल्या मधाच्या गावाचा अधिकृतपणे प्रारंभ होत आहे. यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. पर्यटन विभागाने कृषी पर्यटन धोरणाअंतर्गत मांघर गावाची प्रसिध्दी करावी. पर्यटकांना इथल्या मधुमक्षी पालन कशा पद्धतीने केले जाते, मधावर कशा पद्धतीची प्रक्रिया केली जाते याची माहिती त्यांना घेता येईल. त्याच बरोबर स्थानिकांना अधिकाधिक रोजगार मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावा, असे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
सध्या मधामाशांची संख्या कमी होत चालली आहे. ती वाढविण्यावर भर दिला तरच भविष्यात मोठ्या प्रमाणावर फायदे होणार आहेत. शेतकऱ्यांच्या फळबागा देखील यावरच अवलंबून आहेत. यामुळे याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात मोठे तोटे सहन करावे लागतील.
महत्वाच्या बातम्या;
मोदींचा एक निर्णय आणि जगात मोठी खळबळ, आंतरराष्ट्रीय बाजारात घडणार मोठ्या घडामोडी...
मोठ्या लोकांना सोडता आणि शेतकऱ्यांना पिडता, न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्रला झापले
बातमी कामाची! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो कांदा बिहार केरळमध्ये विका, व्हाल मालामाल...
Published on: 18 May 2022, 11:00 IST