Agriculture Processing

पनीर! नाव ऐकताच तोंडाला पाणी येत, बरोबर ना. असा एखादाच असेल ज्याला पनीर (Paneer) आवडत नाही. पनीरचा वापर हा अनेक भाज्यांमध्ये केला जातो. पनीर पासुन अनेक स्वादिष्ट भाज्या बनवल्या जातात जसे की पालक पनीर, मटर पनीर, पनीर मसाला, शाही पनीर मसाला, पनीर बटर, पनीर कोपता, पनीर मोगलाई इत्यादी. पनीर जसा खायला स्वादिष्ट लागतो तसाच तो आरोग्यासाठी देखील खुप पोषक आहे, म्हूणन डॉक्टर देखील पनीर खायचा सल्ला देतात. पण बाजारात उपलब्ध असलेला प्रत्येक पनीर हा चांगला शुद्धच असतो असे नाही.

Updated on 09 October, 2021 7:28 PM IST

बाजारात अनेकदा भेसळयुक्त पनीर उपलब्ध होतात त्यामुळे आपल्या आरोग्याला धोका पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत घरच्या घरी शुद्ध पनीर बनवण्याची प्रोसेस (Paneer Making Process At Home). चला तर मग जाणुन घेऊया पनीर मेकिंग प्रोसेस अगदी सोप्या स्टेप्समध्ये.

 घरच्या घरी पनीर बनवण्याची प्रोसेस (Paneer Making Process)

वाचक मित्रांनो पनीर बनवण्यासाठी आपल्याकडे खालील सामग्री (Ingredients) असायला हव्यात.

  1. चांगल्या क्वालिटीचे फुल क्रीम दुध - 2लिटर
  2. लिंबूचा रस -2 टेबल स्पून
  3. थंडे शुद्ध पाणी - 1 लिटर

पनीर बनवण्याची प्रोसेस खालीलप्रमाणे

(Paneer Making Process) :

मित्रांनो घरबसल्या बाजारासारखे मऊ आणि मुलायम पनीर तयार करण्यासाठी

»सर्व्यात आधी एक मोठे भांड घ्या. भांड्यात दोन लिटर दूध घाला.

»आता शुद्ध दुध गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा.

»दूध चांगले गरम झाल्यावर त्यात एक छोटा चमचा लिंबाचा रस आणि थोडे पाणी घाला. »मित्रांनो लक्षात ठेवा लिंबाचा रस उकळत असलेल्या दुधात टाका.

»काही वेळाने दूध फाटेल. जेव्हा दूध चांगले फुटते तेव्हा त्यात थंड पाणी घाला आणि गॅस बंद करा.

»आता कपड्याच्या किंवा चाळणीच्या मदतीने फुटलेले दूध गाळून घ्या.

»जेव्हा फुटलेल्या दुधाचे पाणी पूर्णपणे निघून जाते, तेव्हा ते सुतीच्या कपड्यात बांधून एका जड वस्तूच्या खाली ठेवा.

»काही तासांनंतर, जेव्हा पनीरचे सर्व पाणी कापडातून निघून जाईल, तेव्हा आपले पनीर तयार होईल.

»अशा पद्धत्तीने अगदी सहजरित्या घरच्या घरी पनीर तयार करता येतो. तयार झालेला पनीर आता वेगवेगळ्या भाजीमध्ये वापरा आणि आपल्या परिवारासमवेत स्वादिष्ट पनीर डिशेसचा अस्वाद घ्या.

English Summary: homemade making process of cheez knoww that
Published on: 09 October 2021, 07:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)