Agriculture Processing

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अन्न उत्पादन विकासीत करणे आवश्यक आहे. कारण लोक त्यांच्या कामामध्ये अधिक व्यस्त होत आहेत. वेळेची कमतरता लोकांना प्रक्रियाकृत आणि अस्वस्थ अन्न खाण्यास प्रवृत्त करते यामुळे पोषक अन्न पदार्थ्यांचा विकास करणे समाजाची गरज बनली आहे. तसेच सध्याची गरज बगता जवसावर प्रक्रिया करून जवसाची वडी विकसित करण्यात आली आहे.

Updated on 31 March, 2019 8:32 AM IST

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अन्न उत्पादन विकासीत करणे आवश्यक आहे. कारण लोक त्यांच्या कामामध्ये अधिक व्यस्त होत आहेत. वेळेची कमतरता लोकांना प्रक्रियाकृत आणि अस्वस्थ अन्न खाण्यास प्रवृत्त करते यामुळे पोषक अन्न पदार्थ्यांचा विकास करणे समाजाची गरज बनली आहे. तसेच सध्याची गरज बगता जवसावर प्रक्रिया करून जवसाची वडी विकसित करण्यात आली आहे.

जवसाची वडी हा आरोग्यदायी, पौष्टिक व हृदयासाठी फायदेशीर आणि शरीरातील चरबीची पातळी कमी करण्यास मदत करते. मराठी माणसांच्या खाण्यामधले कितीतरी पदार्थ आता कमी झाले आहेत. परंतु जोपर्यंत आपल्या खाण्यात चांगल्या पालेभाज्या होत्या तोपर्यंत त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे शरीराच्या गरजांचा समतोल आपोआप साधला जात होता.

जवस

जवस हे एक गळिताचे तेलबिया वर्गातील पिक आहे. यालाच मराठीमध्ये अळशी, गुजराथी अलसी आणि संस्कृतमध्ये हैमवती, मदगंधा, मलीना, तैलोत्तमा, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा असे म्हणतात. जवसाचा उगम इजिप्त देशातील आहे. महाराष्ट्रात व भारतात जवस हे हिवाळ्यातले (रब्बीचे) पिक आहे. याच्या एका फळात दहा टोकदार चकचकीत चपट्या बिया असतात. त्या बियांपासून तेल निघते. विदर्भात जवसाचे तेल खाद्य पदार्थांमध्ये वापरतात. तेल काढून उरलेली पेंड, गुरांच्या सकस खाद्यासाठी अणि खत म्हणून वापरतात. जवसाच्या बियांची भुकटी करून चविष्ट चटणी केली जाते.

जवसाचे फायदे:

महाराष्ट्रात जवस हे रब्बी हंगामात घेतले जाते, याचे तेल खाद्यपदार्थामध्ये वापरतात. यातील पोषक घटक प्रथिने 20.3%, स्निग्ध पदार्थ 36.1%, तंतुमय पदार्थ 4.8%, क्षार 2.4%,कार्बोदके 28.9%, कॅल्शियम 170 मि.ग्रॅ. फॉस्फरस 870 मि.ग्रॅ. आयर्न 2.7% जवसामध्ये सर्वात जास्त प्रमाणात ओमेगा-3 मेदाम्ले असतात. त्यातील गुणधर्मामुळे अस्थमा, संधिवात, त्वचारोगांवर या आजारांमधे जवसाचा चांगला फायदा होऊ शकतो. जवसाचा बियांच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी कमी होते. व्रण आणि लघवीच्या त्रासावर गुणकारी. खोकल्यावर आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर आराम पडण्यासाठी जवसाच्या बिया चांगल्या असतात आणि हृदयासाठी पौष्टिक असते. जवसाचा बियांचा वापर त्वचारोगांवर बाह्योपचारासाठी उपयोग केला जातो.

साहित्य: जवस, तीळ, गुळ इत्यादी.

प्रक्रिया:

  • जवस व तीळ वेगवेगळे भाजून घेणे.
  • कढई किंवा पातेल्यात गुळ बारीक करून पाक बनवून घ्यावा.
  • केलेल्या पाकमध्ये भाजलेले जवस व तीळ घालून ते चांगले मिक्स करून घ्यावे.
  • तयार झालेल्या मिश्रणाला योग्य तो आकार देऊन वडी बनवून घ्यावी.

जवसाच्या वडीचे फायदे:

जवसाची चिक्की ही बनवण्यास अगदी सोपी व पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे.घरी नेहमी असणारे साहित्य वापरले जाते आणि ह्यात गुळाचा पाक बनून वडी तयार केली जाते. ही वडी अतिशय पौष्टिक आहे. सकाळच्या नाष्ट्याला, मधल्या वेळेत, मुलांना मोठ्यांना अतिशय उपयुक्त अशी वडी आहे. वडीमध्ये 'ओमेगा-3' या मेदाम्ल असल्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या वाहिन्या अवरुद्ध होत नाहीत. यातील 'ओमेगा-3' मुळे त्वचा नितळ होते. पिंपल्स, स्कीन अलर्जी सारखी समस्या दूर होऊन त्वचा तजेदार दिसायला लागते. जवस वडी हा रक्तातील चरबीचे प्रमाण कमी करते तसेच हे सांधेदुखी कमी करते तसेच यामुळे 'ग्लिसराईड' चे प्रमाण कमी होते. याच्या सेवनाने आतड्याचा कर्करोग होत नाही. टाईप–टू डायबेटीस असणार्‍या रुग्णांमध्ये जवसातील लिगनेन हे तंतुमय पदार्थ उपयुक्त ठरते. कारण हे लिगनेन ब्लड शुगरचा समतोल साधते. हृदय रुग्णांसाठी सुध्दा जवसातील काही गुणधर्म उपयोगी पडतात.

जवसाचे उपचारात्मक आणि औषधी मूल्य लक्षात घेता, जवसावर योग्य ती प्रक्रिया करून त्यापासून पौष्टीक असे पदार्थ तयार करणे गरजेचे झाले ठरेल. ज्यामुळे उत्पादकांना अधिक परतावा मिळेल आणि ग्राहकांना फायदेशीर ठरतील. जवसापासून तयार केलेली वडी हि उपचारात्मक, उच्च पौष्टिक मूल्याच्या, स्वादयुक्त पदार्थ आहे व तसेच आकर्षक नैसर्गिक पदार्थांची मागणी पूर्ण केल्याने सहजपणे देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोकप्रिय होऊ शकते.

शिंदे ए.एम, डॉ. पवार व्ही.एस व काळे पी.आर
(अन्न रसायन व पोषण विभाग, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

English Summary: Healthy Flaxseed Cake Chikki
Published on: 30 March 2019, 03:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)