Agriculture Processing

शेतकरी आपला पिकवलेला माल बाजारात विकेपर्यंत अनेक संकटांना सामोरे जात असतो. वाढती महागाई, बदललेले हवामान, नैसर्गिक संकटे अशी अनेक संकटे त्यांच्यावर येत असतात. असे असताना सरकारकडून त्यांना चांगल्या सोयी उपलब्ध झाल्या तर त्यांना चांगले दिवस येतील.

Updated on 21 January, 2022 12:33 PM IST

शेतकरी आपला पिकवलेला माल बाजारात विकेपर्यंत अनेक संकटांना सामोरे जात असतो. वाढती महागाई, बदललेले हवामान, नैसर्गिक संकटे अशी अनेक संकटे त्यांच्यावर येत असतात. असे असताना सरकारकडून त्यांना चांगल्या सोयी उपलब्ध झाल्या तर त्यांना चांगले दिवस येतील. असे असताना आता शेतकऱ्यांची गरज ओळखून आता बाजारपेठा जवळ करण्यासाठी वेगवेगळे पर्याय खुले केले जात आहेत. त्याच माध्यमातून किसान रेल्वेची शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी मोठी मदत झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा होत आहे. तसेच अनेकांना यामुळे रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.

अनेक शेतकरी हे चांगले उत्पादन काढत असतात, मोठ्या प्रमाणावर दर्जेदार फळे आणि भाज्या ते तयार करतात. असे असताना मात्र त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने त्यांना चांगले पैसे मिळत नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत येतो. असे असताना किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहेत, याचे उदाहरण बघायचे झाले तर डहाणूतील घोलवड आणि परिसरातील चिकू अवघ्या 24 तासात दिल्लीला पोहचत आहे. दर्जेदार चिक्कूला आता योग्य ती बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. शिवाय वाहतूकीअभावी होणारे नुकसानही टळले आहे. यामुळे हा शेतकरी समाधानी आहे.

गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांनी याचा मोठा फायदा घेतला आहे. पालघर भागात चिक्कूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दर्जेदार उत्पन्न मिळत असले तरी जवळ बाजारपेठ नसल्याने त्यांना चांगले पैसे मिळत नव्हते. यामुळे शेतकरी नाराज होते. आता मात्र किसान रेल्वेमुळे हा शेतकऱ्यांचा माल थेट दिल्लीत दाखल होत आहे. त्याठिकाणी चांगला बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत आहे. तसेच एका दिवसामध्येच हा माल दिल्लीत जात असल्याने त्याचे नुकसान देखील होत नाही. पश्चिम रेल्वेच्या किसान रेल मधून मागील वर्षभरात 123 ट्रेनमधून तब्बल 35 हजार टन चिकू दिल्लीला रवाना झाला आहे. कोरोना काळापासून ही रेल्वे सुरु करण्यात आली आहे.

यापूर्वी ट्रकद्वारे वाहतूक करावी लागत होती. त्यामुळे 32 ते 34 तास लागत होते. तसेच फळांचे मोठे नुकसान देखील होत होते. यावर किसान रेल्वेच्या माध्यमातून तोडगा निघाला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना अच्छे दिन आले असे म्हणावे लागेल. प्रदेशात देखील पालघर मधील डहाणू, घोलवड, वाणगाव येथील चिकूला मागणी आहे. यामुळे हा चिकू जगप्रसिद्ध आहे. आता तो भारताच्या कानाकोपऱ्यात देखील पोहोचला आहे. असे असले तरी याचा फायदा अजूनही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होत नाही, याचे कारण म्हणजे याबाबत अजूनही अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. यामुळे अनेक शेतकरी या किसान रेल्वेचा फायदा घेऊ शकत नाहीत.

English Summary: Good day to the farmers! Farmers got market due to Kisan Railway, farmers became goods ..
Published on: 21 January 2022, 12:33 IST