शेळीचे दूध हे आरोग्यदायी असते. शेळीच्या दुधापासून विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. या लेखामध्ये आपण शेळीच्या दुधापासून तयार करता येणारे विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची माहिती घेणार आहोत.
परदेशातील उत्पादने
शेळीच्या दुधापासून युरोपात चीज तर रशियात केफिर बनवतात. ग्रीस आणि फ्रान्समध्ये शेळीच्या दुधापासून चे चीज मोठ्या प्रमाणावर बनवले जाते. शेळीच्या दुधातील अटी ऍसिडच्या घटकातील फरकामुळे एक वेगळीच चव त्या चीजला मिळते. हे चीज पांढऱ्या रंगाचे असते, कारण शेळीच्या दुधात कॅरोटीन नसते. दोन टक्के फॅट आणि 10.5 टक्के एसएनएफ ने प्रमाणित करूनशेळीच्या दुधापासून आंबवून बनवलेले पदार्थ युरोप, अमेरिका इत्यादी देशात प्रसिद्ध आहेत. हे पदार्थ व्हिटॅमिन आणि व्हिटॅमिन डी मिसळून पोषण मूल्य वाढवून विकतात. परदेशात शेळीचे दुध आईस्क्रीम तयार करण्यासाठी देखील वापरले जाते. परदेशात काही कंपन्या ह हॅन्डमॅडन्ट गोट मिल्क, सोप, गोट मिल्क लोशन, वीमेन्स बोडी ओईल, गोट मिल्क शंपू बार, गोट मिल्क स्किन केअर क्रीम, शेविंग सोप इत्यादी सौंदर्यप्रसाधने बनवतात.
शेळीच्या दुधापासून तयार करण्यात येत असलेले विविध प्रक्रियायुक्त पदार्थ
- चक्का व श्रीखंड
1-हा पदार्थ घरोघरी तसेच हलवाई कडे सुद्धा तयार केला जातो. मोठ्या शहरातून या पदार्थाला जास्त मागणी असल्यामुळे या पदार्थाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. चक्क्या मध्ये जवळपास 40 टक्के साखर घालून श्रीखंड तयार केल्यावर व्यवस्थित पॅकिंग करून विकल्यास दुधाची किंमत वसूल होते. शेळीच्या दुधापासून च्या चक्क्यात मात्र जास्तीचे आद्रता आणि गाईच्या दुधापासून च्या चक्क्यात कमी आद्रता असते.
- यामुळेच शेळीच्या दुधापासून चा चक्का मऊ आणि कमकुवत अंग बांधणीचा होतो. उत्तम अंग बांधणीचा चक्का तयार होण्यासाठी शेळीचे दुध थोडे जास्त वेळ उकळावे म्हणजेच चक्क्यात येणाऱ्या आद्रता कमी राहील. गाईच्या दुधापेक्षा(45.43 टक्के) शेळीच्या दुधापासूनच्या श्रीखंडात जास्त आद्रता (49.88 टक्के)आढळते.
- दही :
- गाईच्या दुधापासून चे आणि शेळीच्या दुधापासून चे दही चव व दुधाचे पदार्थ बनवले जातात. दुधातील लॅक्टोज हे लहान मुलांना व वृद्धांना बऱ्याच वेळा पचनासाठी अवघड असते पण जेव्हा विरजण घालून दुधाचे दही तयार होते तेव्हा दुधातील लॅक्टोज चे लॅक्टिक आम्लची चयापचयाचे विकार बरे करण्यासाठी मदत होते.
- तसेच दूध विक्री नंतर उरलेल्या दुधाचे विरजण टाकून दही बनवले असता दूध नासण्याचा धोका टळतो व दही विक्रीमुळे सुद्धा दुधाची किंमत सहजरीत्यावसूल होते.त्यासाठी वेगळ्या साधनसामग्रीची व पद्धतीची गरज नाही. शेळीच्या दुधापासून तयार केलेल्या दह्याचा रंग गाईच्या दुधापासून तयार केलेल्या दह्याच्या रंगापेक्षा थोडा उजळलेला पांढरा असतो. हे दही थोडे मऊ असते.
- बटर:
- शेळीच्या दुधातील घटकांमुळे शेळीच्या दुधापासूनच्या बटर मध्ये नेहमीपेक्षा किंवा नेहमीच्या बटर पेक्षा वितळण बिंदू कमी आढळतो. त्यामुळे बटर पसरवणे सोपे जाते. यामुळेच आईस्क्रीम मध्ये याचा वापर करणे सोयीस्कर ठरते. शेळीच्या दुधात केरोटीन नसल्यामुळे बटर ला छान पांढरा रंग येतो.
- शेळीच्या दुधापासून तयार केलेल्या बटरचा वापर आईस्क्रीम, सौंदर्य प्रसाधन आणि रूची आणण्यासाठी अनेक अन्नपदार्थ निर्मिती, केटरिंग सोसेस, मांस तळण्यासाठी होतो.
- चीज :
- चीजचे विविध प्रकार तयार करण्यासाठी शेळीच्या दुधाचा वापर योग्य आहे. शेळीचे दूध वापरून बनवलेले मऊ प्रकारचे चीज फ्रान्स, युरोप, अमेरिका, स्पेन, युगोसलाविया, इटलीत प्रसिद्ध आहे.
- शेळीचे दूध म्हशीच्या दुधासोबत एकत्र करून मॉझरेला चीज साठी वापरता येते.
- खवा :
- शेळीच्या दुधापासून चा खवा किंचित थोडासा पिवळसर आणि कठीण असतो. शेळीच्या दुधापासून च्या खव्या थोडी खारट चव मिळते. ही चव तशी स्वीकार होत नाही. दुधात जास्तीच्या क्लोराइड मुळे खारट चव येते. शेळीच्या दुधापासून खवा करत असताना जवळपासशेवटच्या टप्प्यात तो चिकट होतो. शेवटच्या टप्प्यात फ्री फॅट मुक्त होत नाहीत किंवा सुटत नाहीत. जय गायीच्या आणि म्हशीच्या दुधात प्रामुख्याने आढळून येते.
- खवा चिकट न होण्यासाठी शेळीचे आणि म्हशीचे दूध 1:1 या प्रमाणात घेऊन खवा बनवावा. या प्रकारच्या मिक्स दुधात कमीत कमी पाच टक्के फॅट व नऊ ते दहा टक्के एसएनएफ असावे. या प्रकारच्या खव्यात 29.85 टक्के आद्रता,25टक्के फॅट,18.28 टक्के प्रथिने असतात. शेळीच्या दुधापासून चा खवा थोडासा रवाळ तयार होतो.
- लोणी व तूप:
- खेड्यामध्ये दही बनवून किंवा साई जमा करून त्याला विरजण लावून त्याला घुसळून लोणी तयार करतात. परंतु लोण्याला विशेष मागणी नसल्यामुळे व लोणी हे जास्त दिवस टिकत नसल्यामुळे त्यापासून तूप बनवले जाते. तूप हे जास्त दिवस टिकत असल्यामुळे दूध उत्पादकांना तूप बनवणे जास्त सोयीचे आणि फायदेशीर ठरते. ज्यामुळे अधिक नफा मिळतो.
- तुपामध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण 99% असल्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. पण स्निग्ध पदार्थ अधिक प्रमाणात असल्यामुळे हृदयविकार असलेल्या व्यक्तीने त्याच्या सेवन करणे योग्य ठरणार नाही.
Published on: 27 June 2021, 01:53 IST