यावर्षी आपण पाहत आहोत की, उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.
कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आला तरी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ऊस शेतात उभा आहे. या उसाला तुरे फुटून त्याच्या वजनात घट होण्याची भीती आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होईल यात शंकाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हा ऊस तोडण्यासाठी प्रचंड प्रमाणात धावपळ करावी लागत आहे. हीच बाब कुठल्याहीशेतमालाच्या बाबतीत होते. बाजारपेठेत कधीकधी शेतमालाला इतका कमी दर मिळतो की त्याचा वाहतूक खर्च देखील निघत नाही. त्यामुळे या सगळ्या समस्या यावर एकच उपाय प्रभावी ठरू शकतो तो म्हणजे शेतीमालावर प्रक्रिया हा होय. आपल्याला माहित आहेच कि बऱ्याच प्रकारच्या फळांपासूनप्रक्रिया करून ज्यूस, जाम,जेली इत्यादी पदार्थ तयार करून बाजारात विकले जातात.हीच प्रक्रिया जर उसावर केली तर. तसे पाहायला गेले तर उसावर प्रक्रिया करून साखर बनते परंतु साखर न बनवता त्या पासून जाम बनवला तर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल. याबाबतीत या लेखात माहिती घेऊ.
देशामध्ये पहिल्यांदाच केन जाम निर्मिती
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोईम्बतूर येथील ऊस पैदास केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश जी.एस.यांनी उसाच्यारसाचे मूल्यवर्धन करून देशात पहिल्यांदाच केन जाम निर्मिती केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नुकत्याच झालेल्या 93 व्या वार्षिक सर्वसाधारणसभेत या विकसित उत्पादनाचे अनावरण करण्यात आले आहे. याबाबतची अधिक माहिती देताना संस्थेच्या संचालिका डॉ. जी. हेमप्रभा त्यांनी सांगितले की फळांचे गर आणि साखर यांचे समप्रमाणात मिश्रण करून बाजारात विविध प्रकारच्या व चवीचे जॅम उपलब्ध आहेत.परंतु या उत्पादनात उसाच्या रसाचा पूर्णपणे वापर करून साखर न मिसळता हे उत्पादन कसे केले आहे.
एक टन उसापासून मिळेल 25 हजारांचे उत्पन्न
याबाबतची अधिक माहिती देताना तंत्रज्ञानाचे विकासक डॉ. सुरेश यांनी सांगितले की उसापासून तयार करण्यात आलेल्या जॅममध्ये जीवनसत्वे व्यतिरिक्त पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारखे खनिज भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात. जाम उत्पादनाच्या उद्दिष्टाने गाळप केलेल्या एक टन उसापासून ऊस उत्पादकांना सुमारे 25 हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते असा दावा त्यांनी केला आहे.
व्यावसायिक उत्पादनासाठी कुठे कराल संपर्क?
उसापासून जाम बनवायचे हे तंत्रज्ञान महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यातील दोन कंपन्यांना व्यावसायिक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा परवाना हस्तांतरित करण्यात आला आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांना व्यावसायिक उत्पादनासाठीहे तंत्रज्ञान हस्तांतरित केले जात आहे. इच्छुकांनी संस्थेच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ऊस पैदास संस्था कोईमतूर यांच्याशी संपर्क साधावा.
नक्की वाचा:या पिकासाठी सरकार करणार मदत, आणि कमावू शकता पैसा लाखात
या जॅमची वैशिष्ट्ये
1-यामध्ये उसाच्या रसाची पौष्टिकता आणि चव टिकवून ठेवली जाते.
2- यामध्ये फळांच्या विविध बाबींचे घटक मिसळता येतात.
3- हे उत्पादन विकसित करतानाअननस,चेरी,चॉकलेट,आले लिंबू, आले व दालचिनी या चवीचे जाम तयार करण्यात आले आहे.
4-हा जाम ब्रेड,चपाती, इडली, डोसा आणि केक यासारख्या खाद्य पदार्थांसह वापरला जाऊ शकतो.
5- या उत्पादनात उसाच्या रसाचा पूर्णपणे वापर करून साखर न मिसळता हे उत्पादन विकसित केले आहे.
( स्त्रोत-हॅलोकृषी)
Published on: 19 April 2022, 11:14 IST