भारतामध्ये शेती सोबत पशुपालन व्यवसाय केला जातो. पशुपालन व्यवसायामध्ये दुधाचे उत्पादन हा एक प्रमुख आर्थिक स्त्रोत आहे. बरेच शेतकरी दुधाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवतात.
केंद्र आणि राज्य शासनाकडून देखील पशुपालनासाठी विविध प्रकारचे लोन व सबसिडी देण्यात येतात. जर तुम्हाला स्वतःची डेअरी ( फार्मिंग ) सुरू करायचे असेल तर या स्टार्टअप ला शासनाकडून लोन आणि सबसिडी दिली जाते. याची सुरुवात कशी करावी? याबद्दल या लेखात जाणून घेऊ?
सुरुवातीला चार ते पाच जनावरे घेऊन करू शकतात सुरुवात
जर तुमची गुंतवणुकीची क्षमता कमी असेल किंवा तुम्हाला जास्त धोका पत्करायचा नसेल तर तुम्ही दोन किंवा चार गाई किंवा म्हशी घेऊन स्वतःची डेअरी सुरू करू शकतात. नंतर मागणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे गाई किंवा म्हशींची संख्या वाढवू शकतात. यामध्ये सुरुवातीला दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. परंतु तुम्हाला हा व्यवसाय जर व्यावसायिक तत्वावर सुरू करायचा असेल तर त्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा लाख रुपयांचा आर्थिक बजेट असणे गरजेचे आहे. यासोबतच तुमचा दुधाच्या उत्पादनात सोबतच दुधावर प्रक्रिया करण्याचा विचार असेल तर या बजेटमध्ये आणखी वाढ होते. दूध प्रक्रिया प्लांट टाकण्यासाठी एक करोड रुपयांपर्यंत देखील खर्च होऊ शकतो. त्यामुळे एकदम उडी न घेता हळूहळू हा व्यवसाय वाढवत जाणे हितकारक ठरते.
नक्की वाचा:लक्षणांवरून ओळखायला शिका कोंबड्यांचे आजार; तरच टाळू शकाल भविष्यातील नुकसान
कुठून घेऊ शकता डेअरी फार्मिंगची ट्रेनिंग?
डेरी फार्मिंग मध्ये सर्टिफिकेट लेव्हलचे ते पदवी लेवल पर्यंतचे अभ्यासक्रम असतात. देशातील अनेक शहरांमध्ये या संबंधीच्या संस्था आहेत. जसे की नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट करणाल, आनंद एग्रीकल्चर यूनिवर्सिटी, कॉलेज ऑफ डेअरी अंड फुड सायन्स टेक्नॉलॉजी राजस्थान, संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेअरी सायन्स पटना इत्यादी प्रमुख संस्था यासंबंधीच्या प्रशिक्षण देतात. या संस्थांमधून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स करू शकतात. याशिवाय बर्याच प्रकारचे खाजगी संस्था आणि डेअरी फार्मिंग करणारे लोक देखील यासंबंधीचे प्रशिक्षण देतात. यामध्ये कोर्स नुसार वेगवेगळ्या प्रकारची फी आकारली जाते.
डेअरी स्टार्टअप सुरू करण्यासाठी लोन आणि सबसिडी कुठून घेता येते?
डेअरी स्टार्टअप सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत आर्थिक मदत केली जाते. 10 जनावरांच्या स्टार्टअप सुरु करण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज तुम्हाला मिळू शकते.
या घेतलेल्या लोनवर नाबार्डमार्फत 25 टक्के अनुदान दिले जाते. शिवाय तुम्ही जर आरक्षित वर्गातून येत असाल तर ही अनुदान हे 33 टक्क्यांपर्यंत मिळते.या सबसिडी आणि लोन साठी अर्ज करण्याची पद्धत देखील एकदम सोपी आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड, बँक खाते पुस्तक, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे डेअरी स्टार्टअपचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे गरजेचे असते. या अहवालात तुमच्या बिजनेस चे मॉडेल कसे आहे याबद्दल चा उल्लेख असणे गरजेचे आहे.
नक्की वाचा:मानमोडी आजार आहे कोंबड्यांमधील सर्वात घातक; प्रतिबंधात्मक उपाय ठरतील यावर परिणामकारक
अनुदानाचा लाभ कसा घ्यावा?
1- सगळ्यात अगोदर आपल्या कंपनीचे रजिस्ट्रेशन करावे.
2- त्यानंतर तुमच्या स्टार्टअपचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा.
3- या रिपोर्टमध्ये तुमच्या व्यवसायाचे एक मॉडेल कसे आहे याबद्दलची माहिती असणे आवश्यकआहे.
4-या बाबतीत तुम्ही एखाद्या या क्षेत्रातील व्यावसायिकाचे मदत घेणे फायद्याचे ठरू शकते.
5- सर्व कागदपत्रे सोबत घेऊन बँकेत लोन साठी अर्ज करावा.
6- लोन मंजूर झाल्यानंतर तुम्ही ज्या बँकेत लोन घेतले आहे त्या बँकेकडून नाबार्ड कडे सबसिडी साठी कागदपत्रे पाठवले जातात.
Published on: 05 April 2022, 12:23 IST