Agriculture Processing

मत्स्य व्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय असला तरीही अनेक वैशिष्ट्यांमुळे व आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे देश व जागतिक पातळीवर या व्यवसायास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या व्यवसायाद्वारे मानवास सकस आहारव मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते.मासळीच्या निर्यातीद्वारे देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती सोबत मत्स्यव्यवसायचा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अशा या फायदेशीर मत्स्य व्यवसायातून शेतकरी, बेरोजगार युवक आणि महिलांकरिता रोजगाराच्या संधी विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. अशा काही क्षेत्रांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

Updated on 26 June, 2021 1:59 PM IST

 मत्स्य व्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय असला तरीही अनेक वैशिष्ट्यांमुळे व आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे देश व जागतिक पातळीवर या व्यवसायास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या व्यवसायाद्वारे मानवास सकस आहारव मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते.मासळीच्या निर्यातीद्वारे देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती सोबत मत्स्यव्यवसायचा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अशा या फायदेशीर मत्स्य व्यवसायातून शेतकरी, बेरोजगार युवक आणि महिलांकरिता रोजगाराच्या संधी विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. अशा काही क्षेत्रांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

  • मत्स्य शेती किंवा मत्स्यपालन:

गोड्या पाण्यातील मत्स्यशेती कमीत कमी एक एकर चा तलावात केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने कटला, रोहू, मृगळ  या भारतीय प्रमुख माशांचा तसेच चंदेरा,गवत्या, सायनस या माशांचा संवर्धनासाठी उपयोग केला जातो. मच्छर शेतीचा संवर्धन काळ 10 ते 12 महिने इतका असतो. या काळात माशांची वाढ सरासरी एक किलो इतके होते. मत्स्य शेतीसाठी सर्वात महत्त्वाची आवश्यकता म्हणजे बारमाही पाण्याचा पुरवठा  नदी, कालवेआणि विहिरीच्यापाण्याचा स्त्रोत असणे आवश्यक आहे. त्यानंतर मत्स्यबीज उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. हे मत्स्यबीज चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे असते. तरच मासळीचे उत्पादन चांगले मिळू शकते. पाण्याचा पुरवठा चार ते सहा महिन्यांचा असल्यास मत्स्यबीज उत्पादनाचा व्यवसाय करता येतो. हा व्यवसाय कमी कालावधीमध्ये जास्त नफा देणारा व्यवसाय  आहे. मत्स्यबीजांची वाढती मागणी लक्षात घेतल्यास निश्चितच भरघोस उत्पादन मिळू शकते. कार्प मासळी शिवाय मागुर, फंगस या माशांचे व गोड्या पाण्यातील झिंग्याची ही संवर्धन करता येते.

 सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये शेततळे मोठ्या प्रमाणात तयार होत असूनया शेततळ्याचा वापर मत्स्यशेतीसाठी करता येतो.याद्वारे शेतकरी बांधवांना शेततळ्या मधील पाण्याची साठवणूक करता येतेव शेती किंवा फळबागा करीता या पाण्याचा वापर करता येतो. शेततळ्यातील पाणी खत युक्त असल्यामुळे शेती किंवा प्रभागाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर शेततळे मधील मत्स्य उत्पादना द्वारेआर्थिक उत्पन्न वाढते.असा दुहेरी फायदा शेततळ्यातील मत्स्यशेती मुळे होतो.

  • शोभिवंत माशांचे संवर्धन व प्रजनन:

अलीकडच्या काळात मोठ्या कार्यालयांमध्ये,घरांमध्ये,हॉटेलमध्ये, मॉल्समध्ये शोभिवंत माशांचे एक्वेरियम ठेवले जातात. सुशोभीकरणाचे सोबत वास्तुशास्त्रात या रंगीबेरंगी माशांना  खूप महत्त्व आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या रंगिबेरंगी माशांना प्रचंड मागणी आहे.या माशांचे प्रजनन आधारे मत्स्य बीज तयार करून त्याची विक्री करता येते.काचेच्या विविध आकाराचे एक्वेरियम आकर्षक स्वरूपात तयार करता येतात. त्यामध्ये लागणाऱ्या इतर साधनांची उदा. रंगीत वाळू, वनस्पती, एरेटर्स, फिल्टरचा ही विक्री करता येते.  हा व्यवसाय कमी जागेमध्ये व तुलनेने कमी भांडवलामध्ये ही करता येतो.

  • एकात्मिक मत्स्य शेती :

मत्स्य पालन व्यवसाय सोबत इतर व्यवसाय उदा. पशूपालन, कुक्कुटपालन, बदक पालन, भातशेती असे अनेक व्यवसाय  एकत्रित पद्धतीने करता येतात. या व्यवसायातील साधनांचा वापर मत्स्य शेती करिता व मत्स्य शेती मधील साधनांचा वापर इतर व्यवसायासाठी करता येत असल्यामुळे एकमेकांशी हे व्यवसाय पूरक आहेत. शिवाय वैयक्तिक रित्या करताना होणाऱ्या खर्चाची बचत ही होते व एकूणच नफ्याचे प्रमाण वाढते.

  • मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मिती व्यवसाय:

सध्या विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. हे पदार्थ रुचकर व टिकाऊ असल्यामुळे त्यांना प्रचंड मागणी असते. परंतु सर्वच पदार्थ पौष्टिक असतात असे नाही. अशा वेळेस मासळी पासून विविध पदार्थांची उदा. मत्स्य चकली, मच्छी वडा, मत्स्य शेव, मत्स्य वेफर्स, माशांचे लोणचे, चटणी ई. निर्मिती करता येते. मासे हे पौष्टिक असून त्यामध्ये आवश्यक जीवनसत्वे असतात. तसेच पचण्यास हलके असतात. या गुणधर्मामुळे मत्स्य पदार्थ सर्व वयोगटातील लोकांना अतिशय उपयुक्त ठरतात. हा व्यवसाय विशेषतः महिलांना करण्यासाठी सोयीस्कर आहे. अल्प बचत गटाद्वारे विविध मत्स्य पदार्थ तयारकरून बाजारात विक्री करता येते.युवकांसाठी सुद्धा हा व्यवसाय हॉटेल च्या स्वरुपात करता येतो.जास्त काळ टिकणारे मत्स्य पदार्थ उदा.चटणी,वेफर्स,लोणचे इत्यादी तयार करून विक्री करता येते. कशा रीतीने या व्यवसायाद्वारे घरातील सर्व सदस्यांना स्वयं रोजगार मिळू शकतो.

 

  • मत्स्यखाद्य निर्मिती :

 अनेक ठिकाणी मत्स्य शेतीचा व्यवसाय होत आहे. या व्यवसायासाठी मत्स्यखाद्य हा घटक आवश्यक आहे. मत्स्यपालन यामध्ये उच्च प्रतीचे मत्स्यखाद्य आवश्यक असल्यामुळेमत्स्यखाद्य ची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.मत्स्यखाद्य निर्मितीसाठी व्यवसाय केल्यास निश्‍चितच फायदेशीर ठरू शकतो.

  • कन्सल्टन्सी:

 मत्स्य शास्त्राची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मत्स्यसंवर्धन,शोभिवंत माशांच्या व्यवसाय,मत्स्य पदार्थ निर्मिती व्यवसाया साठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शनगरजू लोकांना देता येते.या व्यवसायाचे संपूर्ण शास्त्रीय माहितीनसल्यामुळे मार्गदर्शन पर हा व्यवसाय ही यशस्वीरीत्या करता येऊ शकतो.

 

 अशा विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये मत्स्य व्यवसाय करण्यास प्रचंड वाव आहे. परंतु त्यासाठी तांत्रिक माहिती असणे आवश्यक आहे. या विषयांमधील प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे तांत्रिक माहिती प्राप्त करूनच हा व्यवसाय अंगी कारावा. म्हणजे व्यवसाय सुरू करताना अडचणीचे न ठरता सोयीस्कर होऊन होणारा तोटा टाळता येतो. मत्स्य व्यवसाय द्वारे ग्रामीण भागातील शेतकरी, युवक व महिलांना स्वयंरोजगार प्राप्त होईलव आर्थिक स्थिती व जीवनमान उंचावेल.

 

English Summary: fish processing
Published on: 26 June 2021, 01:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)