Agriculture Processing

तुम्ही जर स्वताचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आज आपण अशा एका व्यवसायविषयी जाणून घेणार आहोत, ज्याला गुंतवणूक कमी करावी लागेल आणि बचत चांगली होईल.

Updated on 27 September, 2022 2:58 PM IST

तुम्ही जर स्वताचा व्यवसाय ( business) सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आज आपण अशा एका व्यवसायविषयी जाणून घेणार आहोत, ज्याला गुंतवणूक कमी करावी लागेल आणि बचत चांगली होईल.

तुम्ही घरबसल्या बटाटा चिप्स बनविण्याचा विचार करू शकता. हा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम ठरेल. यासोबत तुम्ही तांदूळ कुरकुरीत बनविण्याचा विचार देखील करू शकता. बटाटा चिप्स बनविण्याची पद्धत खूप सोप्पी आहे.

मोठे चिप्स बनवायचे असतील तर मोठ्या मशीन्सची गरज पडेल. कमी गुंतवणूक आणि कमी जागेत तुम्ही स्वतःचा बटाटा चिप्स बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करू शकता. जाणून घेऊया...

बटाटा चिप्स साठी साहित्य - बटाटा, मीठ, पाणी, तेल

रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; मोफत रेशनबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

बटाटा चिप्स मशीन

बटाटा चिप्स बनविण्यासाठी तुम्हाला फक्त 850 रुपयांचं एक मशीन खरेदी करावे लागेल. महत्वाचे म्हणजे कच्च्या मालासाठीही काही खर्च करावा लागणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कच्चा माल १०० ते २०० रुपयांना मिळेल. हे मशीन तुम्हाला ऑनलाइन सहज मिळू शकते.

चिप्स बनविण्याची घरगुती प्रक्रिया

बटाटे धुवा, सोलून घ्या आणि पातळ काप करा, सर्वात चांगले म्हणजे भाज्या सोलण्यासाठी चाकू वापरा. तुकडा सुमारे 2 मिमी जाड असावा. त्यानंतर बटाट्याची मंडळे पाच मिनिटे पाण्यात ठेवा, या कालावधीनंतर पाणी काढून टाका आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने भरतो.

बटाटे पारदर्शक होईपर्यंत आणि पाणी पांढरे होणे थांबेपर्यंत प्रक्रिया पार पाडा. ही प्रक्रिया बटाट्यांमधून सर्व स्टार्च बाहेर काढण्यास मदत करते. पॅन गरम करा आणि एक सेंटीमीटर जाड तेल घाला. बटाट्याचे तुकडे दोन्ही बाजूंनी तळून घ्या, नंतर प्लेटवर ठेवा, भरपूर मीठ शिंपडा आणि थंड होऊ द्या.

तांदळापासून कुरकुरे बनवण्यासाठी साहित्य- तांदूळ, जिरे,कलोंजी (काळे तीळ), पाणी, हळद, तळण्यासाठी तेल,मीठ,साखर

शेतकऱ्यांनो कमी कालावधीत बक्कळ पैसा कमवायचा आहे? तर प्लायमाउथ रॉक कोंबडीचे पालन कराच...

तांदळापासून कुरकुरे बनविण्यासाठी मशीन

कुरकुरे बनवण्यासाठी तुम्ही जर मशीन विकत घेणार असाल तर बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या मशिन्स उपलब्ध आहेत. त्या तुम्ही होलसेल मार्केटमध्ये जाऊन विकत घेऊ शकता. जर तुमच्या बजेटमध्ये बसत असेल ती मशीन घेऊन तुम्ही मशीन विकत घेऊन कुरकुरे बनवू शकता.

मशिनशिवाय तुम्ही कच्चे कुरकुरे सुद्धा होलसेल मध्ये विकत घेऊन त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे फ्लेवर्स टाकून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे पॅक करून विकू शकता. अशाप्रकारे व्यवसाय करून चांगला नफा कमवू शकता.

महत्वाच्या बातम्या 
'या' घरगुती उपायांनी दूर करा शरीरातील थकवा आणि अशक्तपणा; जाणून घ्या
आता तुमची पेन्शन तुम्हाला ठरवता येणार; एलआयसीची सरल पेन्शन योजना देतेय मोठी संधी
पशूपालकांसाठी महत्वाची बातमी! जनावरांच्या आहारातील कॅल्शिअमचे प्रमाण तपासा, अन्यथा...

English Summary: Farmers start amazing business potatoes rice
Published on: 27 September 2022, 02:58 IST