ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या घरी एक तरी देशी गाई आपणास पाहावयास मिळते. देशी गाई पासून मिळणारे दूध उत्पन्न जरी कमी असले तरी तिचे शेण व गोमूत्र खूप फायदेशीर असते. देशी गाई ही आपणाला तिच्या संपूर्ण आयुष्यात भरपूर फायदा करून देते जसे की जिवंत असताना शेण, गोमूत्र, दूध, तर देतेच परंतु मृत पावल्यानंतर देखील तिचे अनेक उपयोग शेतीसाठी आहेत.
यामध्ये गाईची खूरे, हाडे, शिंगे ही उत्कृष्ट पद्धतीचे खत निर्मितीसाठी वापरली जातात मृत पावलेली गाई आपण ज्या ठिकाणी पुरतो त्या ठिकाणी पुढील काही वर्ष उत्कृष्ट दर्जाचे पीक उत्पादन येते अश्या पद्धतीने आपणास 'जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी' गाई मदतच मदत करते. त्यामुळे आपल्या स्वार्थासाठी मुक्या जनावरांना छेडू नका प्राणी मात्रावर दया करा.
मानवी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत देशी गायीचे शेण, दूध व गोमूत्राचे खूप महत्त्व वेदांमध्ये सांगितले तर आहेच. देशी गाईपासून मिळणारा कोणताच पदार्थ वाया जात नाही आपणास गाईचे शेण हा पदार्थ जरी टाकाऊ वाटत असला तरी त्यापासून ३३ प्रकारची अन्नद्रव्ये उपलब्ध करणारे उपयुक्त जिवाणू शेण व गोमूत्राच्या माध्यमातून जमिनीला मिळत असतात तसेच शेणापासून शेतीसाठी कंपोस्ट खत, गांडूळखत, गोबर गॅस आपण तयार करू शकतो. एवढेच नव्हे तर आपण शेणापासून पर्यावरण पूरक विविध पदार्थ बनवून चांगले अर्थार्जन देखील करू शकतो.
दोन राज्यपालपदे आणि दोन केंद्रीय मंत्रीपदे! शिंदे गटाच्या 'या' नेत्यांची लागणार वर्णी
यामध्ये धूपकांडी, मच्छर अगरबत्ती, गोवऱ्या, भांडी घासण्याची पावडर, चपला, कुंड्या इत्यादी. याच अनुषंगाने धेनू टेक सोलुशन्स प्रा.लि या नामांकित कंपनीने मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी असणाऱ्या व घरोघरी लागणाऱ्या ईकोदीप (पणती) निर्मिती या सूक्ष्म व्यवसायाचे एक यशस्वी मॉडेल तयार केले आहे.
दिपकार मशीनची खास वैशिष्ट्ये-
आकाराने लहान व वजनाने हलकी.
वापरण्यास अगदी सुलभ व सोपी.
सहज हातातून नेता येण्याजोगी.
विजेची गरज भासत नाही.
कमीत कमी देखभाल खर्च.
साच्या बदलण्यासाठी सोयीस्कर.
येत्या आठ दिवसांत मिळणार पीक विम्याची भरपाई रक्कम, अब्दुल सत्तार यांची माहिती
या उपक्रमाबद्दल सांगायचे झाले तर ग्रामीण महिला ईकोदीप बनवतात तर शहरी महिला ईकोदीपची चांगल्या किंमतीला आपल्या सोसायटीमध्ये तसेच डिजिटल पद्धतीने विक्री करतात हा उपक्रम सध्या पुणे, कोल्हापूर, रायगड, अहमदनगर, पंढरपूर, उस्मानाबाद, या ठिकाणी यशस्वीरीत्या सुरू आहे. यामुळे अनेकांनी यामध्ये चांगले पैसे कमवले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो गाय, म्हैस आणि शेळी खरेदी विक्रीसाठी अॅप, सर्व कामे होतील एका क्लिकवर
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार तरी कधी? 110 दिवसात 1100 शेतकऱ्यांची आत्महत्या..
शेतकऱ्यांना दिवसाच वीज द्या! आता युवासैनिक उतरले मैदानात..
Published on: 18 November 2022, 02:10 IST