राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये सातत्याने कृषिप्रदर्शन भरवण्यात येतात. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात अधिक पिके घेतली जात असल्याने कृषी प्रदर्शनला भरघोस प्रतिसाद मिळत असतो. मात्र, कधी न भरणाऱ्या कोकणात पहिल्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पालघर जिल्हयातील वाडा तालुक्याच्या पालसई येथे कोकणातील कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. ५ आणि ६ मे रोजी हे प्रदर्शन पार पडणार आहे.
असून वाडा झिनिया कोलम उत्पादक सहकारी संस्थे तर्फे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनात जवळळपास १०० कंपन्या शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने या प्रदर्शनात सादर करणार आहेत. शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे प्रदर्शनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले. वाडा हा शेतीप्रधान तालुका असून येथील वाडा कोलम तांदूळ जगप्रसिद्ध आहे.
कृषी व्हेज सीड निर्मित १२५ बियाणांची लागवड प्रदर्शनावेळी शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. शेतीमध्ये उपयोगात येणारी यंत्रे, उपकरणे पाहण्यासाठी पुणे, नाशिक सारख्या कृषी प्रदर्शनात जाणे कोकणातील शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे कोकणातील पालघर व ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे कृषी प्रदर्शन लाभदायी व प्रेरणा देणारे ठरणार आहे. प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, यंत्रांचा वापर यात अनुभवायला मिळणार आहे. नवनवीन उद्योजकांचा सहभाग या प्रदर्शनात नोंदवला गेल्याने शेतीतील बारकावे शिकण्याची संधी शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वास आयोजक किरण पाटील यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांना शेतीमध्ये नवीन दिशा देऊन त्यांना नवसंजीवनी देण्याच्या संकल्पनेतून 'कृषी व्हेज' या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून कृषी क्षेत्रातील अनेक कंपन्या या प्रदर्शनात भाग घेऊन प्रात्यक्षिके दाखवणार आहेत. त्यामुळे येथील शेतकरी देखील आधुनिकतेचा फायदा घेऊन अधिक उत्पन्न घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या कृषी प्रदर्शनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड, राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे.
तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, खासदार राजेंद्र गावित, आमदार अमित झनक, सुनील भुसारा, दौलत दरोडा, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, श्वेता महाले आदि मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना ही एक पर्वणी ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
बातमी कामाची! सोयाबीनसाठी 53 हजार तर उसासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज; पीककर्जाची प्रक्रिया सुरु
साखर कारखान्यांबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले ज्यांच्यात धमक असेल त्याने..
शेतकरी आत्महत्या करतील या गडकरींच्या वक्तव्यावर राजू शेट्टी आक्रमक, म्हणाले व्वा गडकरी साहेब..
Published on: 27 April 2022, 03:55 IST