शेती व्यवसाय हा देशाच्या सामाजिक आणि आर्थिक बाबतींत अनन्यसाधारण महत्व असणार क्षेत्र आहे .कोरोना काळात किती तरी व्यवसाय, उद्योग ठप्प पडले. मात्र शेती आणि शेतीशी निगडित असणारे व्यवसायातील वाढ तर आपण सगळ्यांनी पहिली. शेतीचे व्यवस्थापन कितीही नीटके असले तरी शेती क्षेत्रात आपत्कालीन येणाऱ्या संकटांची कमी नाही. अवकाळी पाऊस असो गारपीट असो यांमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई करणं कठीणच. यातूनच कर्जबाजारी, इतर गोष्टींचा खर्च, पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होतात आणि मग आत्महत्या सारख्या गोष्टींना बळी पडतात.
त्यामुळे शेती सारख्या क्षेत्रात काम करताना तुम्हाला त्यांच्या जोडव्यवसायांची माहिती असणं गरजेचं आहे. जेणेकरून शेतकरी वर्गाला शेती व्यवसाय करणं सोयिस्कर होईल. तर आजच्या या आपल्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत शेती संबंधितीतील जोडव्यवसाय. शेती संबंधित अनेक जोड व्यवसाय आहेत त्यातील पशुपालन हा सर्वात अग्रेसर जोड व्यवसाय आहे. तर जाणून घेऊया पशुपालन संबंधितीतील व्यवसाय.
पशुपालन संबंधित केले जाणारे व्यवसाय -
१. कुक्कुटपालन : 'पोल्ट्री फार्म' हे भारतातील मोठे स्वयंरोजगार म्हणून ओळखले जाते. सध्यस्थितीला अंडी आणि कोंबडीच्या मांसाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे तसेच कोंबडीपालन करून कोंबडीची अंडी तसेच कोंबडी विकणे हा जोडव्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. हा व्यवसाय शेतकरी वर्गासाठी फायदेशीर आहे. कुक्कुटपालन या जोड व्यवसायात आपण खाद्य तसेच उत्पादन कंपनीच्या मागणीनुसार कोंबडी तसेच पोल्ट्री फार्ममधील जनावरांची काळजी घेत असतो.
२. मधमाशी पालन : या व्यवसायात मधुमक्षिका म्हणजेच मधमाशींचे पालन करून त्यांपासून मध मिळविणे आणि ते मध विकणे हा असतो. सर्वात जुन्या गोड पदार्थांपैकी मध हा एक घटक आहे. तसेच त्याचे आरोग्यविषयक फायदे आणि उपयोग देखील बरेच आहेत. शेतकरी वर्ग हा जोड व्यवसायदेखील करू शकतो.
३. मासे पालन : मत्स्य व्यवसाय हा भारतातील एक नफा देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. ह्या व्यवसायात आपण मासेपालन करून नंतर त्याच माशांची विक्री करत असतो. हा व्यवसाय समुद्री भागात राहणारे लोक जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे हा सुद्धा शेतीशी निगडित जोडव्यवसाय फायदेशीर आहे.
४. ससे पालन : हा व्यवसाय अत्यंत कमी जागेत व कमी भांडवलात सुरू होणारा व्यवसाय आहे. हा सुद्धा एक चांगला जोड व्यवसाय असून शेतकरी वर्गाला फायदेशीर ठरू शकतो. अनेकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे कमवले आहेत. यामुळे हा व्यवसाय देखील फायदेशीर आहे.
५. गांडूळ पालन : कंपोस्ट हे अन्न उत्पादकांसाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे. त्यामुळे तुम्ही कंपोस्ट बनवून ते शेतकरी आणि बागायतदारांना विकू शकता आणि यातूनच तुम्ही तुमची स्वतःची गांडूळ फार्म देखील सुरू करू शकता. हे जोडव्यवसाय शेतकरी वर्गाला सोयिस्कर ठरणारे आहेत. शेती सारख्या क्षेत्रात शारीरिक मेहनत तर अमाप आहे. मात्र शेती पद्धतींचे ज्ञान तसेच शेती व्यवसाय विकसित करण्याचे ज्ञान आणि अनुभव आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या;
लोडशेडिंगबाबत ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा, कोणत्या भागात किती तासांचे भारनियमन, जाणून घ्या...
आता झोपो आंदोलन!! महावितरण विरोधात आता शेतकरी आक्रमक
Published on: 22 April 2022, 12:57 IST