Agriculture Processing

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली आहे.या योजनेच्या माध्यमातून अनेककृषी प्रक्रिया उद्योग, छोटे-मोठे उद्योगधंद्यांना अर्थसाहाय्य केले जाते.तुम्हीसुद्धा या योजनेच्या माध्यमातूनस्वतःचा टोमॅटो सॉसचायुनिट उभारु शकता. या लेखामध्ये आपण मुद्रा योजनेच्या माध्यमातून टोमॅटो सॉसचायुनिट कसा सुरू करू शकतो ते पाहू.

Updated on 20 September, 2021 3:26 PM IST

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली आहे.या योजनेच्या माध्यमातून अनेककृषी प्रक्रिया उद्योग, छोटे-मोठे उद्योगधंद्यांना अर्थसाहाय्य केले जाते.तुम्हीसुद्धा या योजनेच्या माध्यमातूनस्वतःचा टोमॅटो सॉसचायुनिट उभारु शकता. या लेखामध्ये आपण मुद्रा योजनेच्या माध्यमातून टोमॅटो सॉसचायुनिट कसा सुरू करू शकतो ते पाहू.

 आपण कुठल्याही हॉटेलमध्ये गेलो तसेच आता बर्‍याचशा कुटुंबांमध्ये टोमॅटो सॉस हेसर्रासपणे वापरली जाते.तसेच टोमॅटो सॉस चे पाऊचआणि बाटल्यांची मागणीदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या या टोमॅटो सॉस युनिटलासरकार मुद्रा योजनेच्या माध्यमातून आधार देऊ शकते.

 टोमॅटो सॉस प्रोजेक्ट कॉस्ट किती असते?

 प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रोजेक्ट प्रोफाइल नुसार जर तुम्ही टोमॅटो मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करणार असाल तर तुमच्याकडे जवळ जवळ दोन लाख रुपयांपर्यंतभांडवल असणे गरजेचे आहे.त्यावर तुम्ही दीड लाख तरम लोन आणि जवळ जवळ 4 लाख 36 हजार वर्किंग कॅपिटल लोन घेऊ शकतात. हे सगळे मिळून प्रकल्प किंमत ही जवळजवळ सात लाख 80 हजार रुपयांपर्यंत जाते.

टोमॅटो सॉस कसा तयार केला जातो?

 टोमॅटो सॉस तयार करण्यासाठी सगळ्यात अधिक पिकलेली आणि वॉश केलेले टोमॅटो स्टीम कॅटलमध्येउकडावे लागतात. नंतर हे उकडलेले टोमॅटो शिजवले जातात आणि बिया, फायबर आणि ठोस कचऱ्यापासून रस वेगळा काढला जातो.या रसामध्ये अद्रक, लवंग,काळी मिरी,मीठ,साखर, सिरका इत्यादी मसाल्याचे पदार्थ मिक्स केले जातात. शिफारस केलेल्या मात्रेतप्रीझर्व पल्प मध्ये मिसळला जातो आणि नंतर सॉसथंडा केला जातो. यानंतर हा तयार सॉसपाऊच आणि बॉटल मध्ये पॅक केला जातो.  त्यानंतर हा माल विक्रीसाठी उपलब्ध होतो.

 

आर्थिक समीकरण

 मुद्रा प्रकल्प अहवालानुसार या प्रकल्पासाठी तुम्ही एक वर्षभर जवळजवळ तीस हजार किलो टोमॅटो सॉस तयार करू शकता आणि आणि याच वर्षाच्या प्रोडक्शन कॉस्ट 24 लाख 37 हजार रुपये येईल. जर तुम्ही तीस किलो स्वास 95 रुपये प्रति किलोचा रेटनेबाजारात सप्लाय केला तर तुमचा वार्षिक टर्नओव्हर 28 लाख 50 हजार रुपये असेल. म्हणजे तुम्हाला 4 लाख 12 हजार रुपयांचा  इन्कम मिळेल नंतरतो दरवर्षी वाढत जाईल.

English Summary: establishment process of tommato saus making unit
Published on: 20 September 2021, 03:26 IST