Agriculture Processing

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. म्हणून या वर्षी पुन्हा शेतकऱ्यांनी गुणवत्ता-पूर्ण शेवगा उत्पादन घेऊन बाजारात शेंगा उपलब्ध केल्या. एक्स्पोर्टची मागणी तेवढीच आहे, पण उत्पादन चार पट झाल्याने बाजार भाव कोसळले. मारतीय ग्राहकाने त्याकडे पाठ फिरवली आहे. एका बाजूला कॅलशियमची कमतरता वाढून गुडघे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत.

Updated on 25 September, 2021 11:22 AM IST

तर त्यासाठी समुद्रातील शिम्प्ल्यांचे कॅलशियम दळून तयार केले जाते व त्याच्या महागड्या गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत. 

 

तर जनावरांचे कॅलशियम कमी झाल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्याही वाढलेल्या आहेत. 

 

दुधाची गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे लहान मुलांचे दात किडून जाताना दिसत आहेत. 

 

आज बाजारात शेतकरी २५ ते ३५ रुपये किलोने शेवगा विकत आहे, तरी ग्राहक नाक मुरडत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर ते पुढे शेवग्याचे पीक घेणे थांबवतील. मग हाच शेवगा इसराईल मधून भारतात १५० ते २०० रुपये किलोने येईल व तेव्हा तो रांगा लाऊन आपल्याला घ्यावा लागेल. 

महिलांनी त्यांचे सुगरणीचे गूण उपयोगात आणून शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना द्यावे तसेच त्याचे सूप तयार करून द्यावे.

आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे. 

आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे. 

शेवग्याची शेंग भाजी, सूप शेवग्याचे सरबत करून ते फ्रीझमध्ये थंड करून सरबत करून द्यावे.

शेवग्याची चटणी, शेवगा सूप, शेवग्याचे पराठे, पापड, अश्या नाना गोष्टी करता येतील. 

ह्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. 

त्याचे कोणाला मार्गदर्शन लागल्यास लोक ते द्यावयास तयार आहेत. 

महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी व स्वत:च्या कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी बाजारातील वाढीव शेवगा विकत घेऊन सर्वतोपरी सहकार्य करावे. 

ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत, त्यांनी शेवगा पाला व शेंगा दळून त्याची रोज २५० ते ५०० ग्राम भुकटी जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचवावी.  स्वत:साठी सुद्धा ते सकस दूध वापरावे व इतरांना देखील तसे सांगून ५ रुपये जादा दराने विकावे. 

शेत मालाला योग्य दर मिळण्यासाठी व ते टिकवण्याची जबाबदारी हि शेतकर्याची एकट्याची नाही ती आपल्या सर्वांची आहे. 

निसर्ग उपचारात शेवग्याचे फार मोठे महत्व आहे. 

त्यापासून -

 

गाजराच्या १० पट अ जीवनसत्व  मिळते.

दुधाच्या १७ पट कॅलशियम मिळते.

केळ्यांच्या १५ पट पोट्याशियम मिळते, 

पालकाच्या २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटीन मिळते. 

अशी परिस्थिती असताना ग्राहकाने पायावर धोंडा पाडून घेऊ नये व शेतकऱ्यांनी पण हे पीक वाया न घालवता जनावरांसाठी पोषक तत्व म्हणून त्याचा विचार करावा. गरज भासल्यास मला विचारावे. त्यासाठी मोफत मार्गदर्शन हवे असल्यास आम्ही ग्लोबल सोसायटीच्यावतीने मदतीस तयार आहोत. 

शेंगांचा गर काढण्यासाठी त्या शिजवून घेऊन त्याचा गर काढून तो वाळविता देखील येतो.

हे ओर्गानिक कॅल्शियम पचनास चांगले असते. जास्त पक्व शेंगा घेतल्यास त्यात जास्त कॅल्शियम मिळते. मात्र ते सावलीत वाळवून ठेवावे लागते. 

 

एक्स्पोर्टचे कारण :

पाश्च्यात्य देशात जंक-फूडमुळे हाडांचे विकार वयाच्या १५ व्या पासूनच दिसत आहेत. 

हाडांचे झिजणे, कॅलशिमच्या कमतरता रोखण्यासाठी तेथे शेवग्याचा वापर चालू झाला आहे. 

 

लेखक - शरद केशवराव बोंडे.

प्रतिनिधी - गोपाल उगले 

English Summary: Eat shevaga without taking calcium tablets.
Published on: 25 September 2021, 11:22 IST