Agriculture Processing

सध्या शेतकरी बंधूंसाठी शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करणे खूप गरजेचे आहे. शेतकरी बंधूनी दर शेतीसोबत असे उद्योग उभे केले तर नक्कीच आर्थिक समृद्धी होईल यात शंकाच नाही. शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमध्ये बऱ्याच प्रकारच्या उद्योगांचा समावेश होतो. जर आपण एकंदरीत विचार केला तर शेतमालावर प्रक्रिया करून उत्पादित मालाला बाजारपेठेमध्ये कायमच चांगल्या प्रकारची मागणी असते.

Updated on 16 September, 2022 8:42 AM IST

सध्या शेतकरी बंधूंसाठी शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करणे खूप गरजेचे आहे. शेतकरी बंधूनी दर शेतीसोबत असे उद्योग उभे केले तर नक्कीच आर्थिक समृद्धी होईल यात शंकाच नाही. शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमध्ये बऱ्याच प्रकारच्या उद्योगांचा समावेश होतो. जर आपण एकंदरीत विचार केला तर शेतमालावर प्रक्रिया करून उत्पादित मालाला  बाजारपेठेमध्ये कायमच चांगल्या प्रकारची मागणी असते.

यामध्ये जर आपण डाळ मिल प्रक्रिया उद्योगाचा विचार केला तर हा व्यवसाय खूप चांगला चालणारा असून डाळ हा आहारातील एक प्रमुख पदार्थ असल्यामुळे त्याला वर्षभर चांगली मागणी आहे. या लेखामध्ये आपण डाळ मिल उद्योगा विषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:Bussiness Tips: 'बटाटा वेफर्स'उद्योग देईल आर्थिक समृद्धी, वाचा सविस्तर माहिती

 डाळ मिल उद्योग

 डाळ मिल उद्योग यामध्ये तुरीवर प्रक्रिया करून त्यापासून डाळीचे निर्मिती केली जाते. मराठवाडा आणि विदर्भमध्ये तुरीचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अशा भागातील शेतकऱ्यांसाठी डाळ मिल प्रक्रिया उद्योग खूप वरदान आणि आर्थिक नफा देणारा ठरू शकतो.

यामध्ये आपण मिनी डाळ मिलचा विचार केला तर यामध्ये आपण दिवसाला 100 ते 120 किलो तुरीवर प्रक्रिया करू शकतो व त्यातून 75% उतारा असतो म्हणजे शंभर किलो मागे 75 किलो आपल्याला डाळ मिळते. या मिनी डाळमिल मध्ये आपण तुरी वरच नाहीतर उडीद, मुग, हरभरा इत्यादीवर देखील प्रक्रिया करून डाळ बनवू शकतो.

 अशा पद्धतीने तुरीपासून करतात डाळ तयार

 तुरीपासून डाळ तयार करण्याच्या दोन पद्धती असून एक म्हणजे तेल लावून कोरडी तूर भरडतात आणि दुसरी म्हणजे पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी भरडतात.

यामध्ये दुसरा प्रकार आहे म्हणजे पाण्यात तूर भिजत ठेवल्यामुळे त्यातील जीवनसत्त्वे आणि प्रथिनांचा र्‍हास होतो आणि त्याचे पोषणमूल्य कमी होते. जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये तुरीचे उत्पादन खूप जास्त प्रमाणात होते. परंतु प्रक्रिया करण्यासाठी शहरात जावे लागते.

त्यामुळे ग्रामीण भागात डाळ मिल उद्योग करणे खूप गरजेचे आहे. जर तुमचे गाव 10,000 ते 12,000 लोकसंख्येच्या असेल तर अशा ग्रामीण भागात हा उद्योग खूप चांगल्या पद्धतीने पीक पकडू शकतो. शेती म्हटले म्हणजे ग्रामीण भागात तुरीची लागवड असतेस त्यामुळे  तुर देखील मुबलक प्रमाणात ग्रामीण भागात मिळणे शक्य आहे.

नक्की वाचा:'या' वनस्पतीची लागवड करून मिळवा भरघोस उत्पन्न; केंद्र सरकारही करतंय मदत

डाळ मिलचे एकंदरीत स्वरूप

 त्यामध्ये धान्याची चाडी असते. म्हणजे यामध्ये 10 ते 15 किलो तूर व इतर धान्य त्यात बसेल एवढे भांडे असते त्याला आपण चाडी असं म्हणू शकतो. त्याच्या अगदी टोकाला एक झडप असते. याच्या माध्यमातून रोलर मध्ये धान्य पडते त्याचा वेग नियंत्रित केला जातो.

डाळ मिल मधील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे रोलर हा होय. यामध्ये तुरीला क्रश केले जाते तसेच बेरिंगच्या साह्याने फिरणारा गोल दंडुका आणि त्याखाली असणारे चाळणी यांच्यात घर्षण होऊन तुरीवरील साल बाहेर काढले जाते व चाळणीतून बाहेर पडते. या बाहेर पडणाऱ्या सालीला किंवा फोलपटाला बाजूला करण्यासाठी पंखा असतो.

या पंखा त्यामुळे डाळ आणि फोलपटे वेगळी होतात. डाळ मिलचा एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ऑगर कन्वेयर हा होय. यामध्ये डाळीवर प्रक्रिया होते म्हणजे थेंबाथेंबाने त्यावर तेल सोडले जाते ज्याने त्यावर तेलाचा थर बसतो.

 लागणारी गुंतवणूक

 जर तुम्हाला प्रति तास 100 किलो डाळ तयार करायचे असेल तर या क्षमतेच्या डाळ मिल उभारण्यासाठी जवळपास 80 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत भांडवल लागते व प्रतितास 400 किलो डाळ बनवायचे असेल तर यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च डाळमिलसाठी येतो.

 यामध्ये लागणारी भांडवल

 साधारणपणे दोन ते पाच लाखापर्यंत भांडवल लागते.

 कच्चामाल

 यामध्ये तुम्हाला तूर, मुग, उडीद इत्यादी कच्चामाल लागतो. म्हणजे तुम्हाला कोणती डाळ तयार करायचे आहे त्यावर हे अवलंबून आहे.

 कच्चामाल कुठून मिळेल?

 तुम्हाला डाळमिल साठी लागणारा सगळा कच्चामाल शेतकऱ्यांकडून उपलब्ध होतो.

यंत्रसामग्री साठी लागणारे भांडवल

 साधारणतः एक ते तीन लाख रुपयांपर्यंत

 लागणारे वर्कर

 साधारण दहा डाळ मिल उद्योग तुम्हाला एक ते चार कामगार राहिले तरी चालते.

 डाळीची विक्री कशी करावी?

 यासाठी तुम्ही एखाद्या विक्रेता सोबत करार करू शकतात किंवा स्वतःची तयार केलेले डाळ पॅकिंग करून स्वतःचा ब्रँड निर्माण करून त्या ब्रँडच्या  माध्यमातून तुम्ही डाळीची विक्री करू शकता.

नक्की वाचा:Bussiness Tips: 20 ते 25 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून प्रतिमहा लाखो रुपये कमावण्याची संधी देतो 'हा'व्यवसाय

English Summary: daal mill uydyog is less investment bussiness and give good profit to farmer
Published on: 16 September 2022, 08:42 IST