Agriculture Processing

भाज्यापाल्यांची आवक घटल्याने सध्या बाजारात भाज्यापाल्यांना चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी भाज्यापाल्यांची लागवड करून चांगले उत्पन्न घेऊ शकतात.

Updated on 25 August, 2022 3:56 PM IST

भाज्यापाल्यांची आवक घटल्याने सध्या बाजारात भाज्यापाल्यांना चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी (farmers) भाज्यापाल्यांची लागवड (Cultivation of vegetables) करून चांगले उत्पन्न घेऊ शकतात.

भारतात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात भाजीपाला तसेच फळबाग पिकांची शेती करत असतात. गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधवांनी उत्पन्न (Farmer Income) वाढीच्या अनुषंगाने कमी दिवसात तयार होणाऱ्या भाजीपाला पिकाची शेती सुरू केली आहे.

Poultry Farming: 250 अंडी देणारी प्लायमाउथ रॉक कोंबडी पाळा; कमी खर्चात मिळणार जास्त नफा

भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन

चांगल्या उत्पादनासाठी भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करा. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.

टोमॅटो पीक

टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.

Tur Market Price: तूर उत्पादकांसाठी महत्वाची बातमी; बाजारातील चित्र बदलले, मिळतोय 'हा' दर

मिरची पीक

मिरची पिकावरील मर (ॲन्थ्रॅकनोझ) व्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला काढल्यानंतर लगेचच सावलीच्या जागी ठेवा. जेव्हा ढीग तयार होतात तेव्हा या फळे आणि भाज्यांमधील आर्द्रतेचे प्रमाण वाढते आणि दडपणामुळे भाजीपाला खराब होतात. काढणीनंतर भाज्या टोपल्यांमध्ये भरा, जेणेकरून उत्पादन योग्यरित्या उचलून पॅकिंगसाठी नेले जाईल.

महत्वाच्या बातम्या 
Onion Machine: आता शेतकऱ्यांचे नुकसान टळणार; कांदा सडतोय सांगणारे उपकरण लॉन्च
Castor Crop: एरंड पिकाची लागवड करा आणि कमी खर्चात मिळवा आश्चर्यकारक नफा
Sweet Potato: रताळ्याचे सेवन केल्याने बीपी राहतो नियंत्रित; आणखी आहेत आश्चर्यकारक फायदे

English Summary: Crop Management Farmers management vegetables
Published on: 25 August 2022, 03:50 IST