Agriculture Processing

पनीर हा पदार्थ दररोज बऱ्याच ठिकाणी भाज्यात वापरला जातो. त्याचबरोबर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मध्ये देखील पनीरची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते. या मागणीला अनुसरून आपण पनीर बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. या लेखात आपण पनीर उद्योग कसा करावा याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 08 December, 2021 8:28 PM IST

पनीर हा पदार्थ दररोज बऱ्याच ठिकाणी भाज्यात वापरला जातो. त्याचबरोबर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मध्ये देखील पनीरची  मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते. या मागणीला अनुसरून आपण पनीर बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतो.  या लेखात आपण पनीर उद्योग कसा करावा याबद्दल माहिती घेऊ.

 पनीर उद्योग एक संधी

 पनीर हा पदार्थ दुधापासून बनवला जातो. दुधाचा अतिशय लवकर खराब होणारे पदार्थ असल्याने  दूध उत्पादकांना लवकरात लवकर दूध आपल्या ठिकाणी पोहोच करणे गरजेचे असते. नाहीतर बऱ्याच वेळा खराब होते. त्यामुळे दूध टिकवून ठेवणे अवघड जाते. त्यास पर्याय म्हणून आपण दूध यापासून पदार्थ बनवून विकू शकतो. पनीर म्हणजे दुधापासून आमल साखळीत झालेले जास्तीचे पाण्याचे प्रमाण काढून टाकले असता होणारा पदार्थ म्हणजे पनीर. पनीर हे सामान्य दुधापेक्षा जास्त काळ टिकत असल्यामुळे  बाजारात मागणी जास्त असते. पनीर मध्ये स्निग्ध  पदार्थांचे प्रमाण जास्त असते.शाकाहारी लोकांना पण प्रथिने  सुद्धा मिळतात.पनीर बनवण्यासाठी डायरेक्ट मशीन सुद्धा अवेलेबल आहेत. त्याद्वारे आपण पनीर बनवू शकतो.

पनीर बनवण्याची पद्धत

 पनीर बनवण्यासाठी प्रथम एका स्वच्छ पातेल्यामध्ये स्वच्छ निर्मळ व ताजे दूध घ्यावे लागते.आपण प्रथम सहा ते आठ लिटर दुधासाठी पद्धत पाहूया. दूध 82 टक्के तापमानावर पाच ते आठ मिनिटे तापवावे. त्यानंतर त्याचे तापमान 70 टक्‍क्‍यांपर्यंत कमी होऊ देऊन दुधात एक ते दोन टक्के तीव्रता असलेले सायट्रिक ऍसिड टाकायचे आहे किंवा तुम्ही त्यात लिंबाचा सुद्धा उपयोग करू शकता.फाटलेले दूध दुसर्‍या भांड्यात उतरवून घेतानाकपड्यातून गाळून घ्यावे.

पहिले पातेल्यातील दूध ओतावे. कापडावर पाणी वगळता उरलेल्या घन पदार्थ  जमा होईल. जमा झालेला घनपदार्थ  लाकडी छोटी पेटीत टाकायचे आहे. ज्यातून पाणी बाहेर पडेल व पनीर तयार झाल्यास ते सात ते आठ अंश असलेल्या पाण्यात  तीन ते चार तास ठेवावे. म्हशीच्या दुधापासून ते 22 टक्‍क्‍यांपर्यंत  पनीर मिळते तर गाईपासून 16 ते 18 टक्के मिळते.

 पनीर उद्योगाचे आर्थिक गणित

  • एकूण भांडवल- 20 ते 30 हजार कमीत कमी जर मोठ्या प्रमाणात करायचा झाल्यास दोन ते तीन लाख
  • लागणारा कच्चामाल- दूध पॅकेजिंगसाठी बॉक्स
  • कच्चामाल मिळण्याचे ठिकाण- स्थानिक मार्केट व काही माल शेतकऱ्यांकडून
  • मशिनरी- पनीर मेकिंग मशीन तुम्हाला दहा हजार ते एक लाखापर्यंत मिळेल कॅपॅसिटी नुसार
  • मशिनरी किंमत- 10 हजार ते एक लाख
  • लागणारे मनुष्यबळ- दोन ते तीन
  • विक्रीच्या ठिकाणे-हॉटेल्स ला मागणीनुसार पुरवठा करता येतो तसेच केटरिंग वाल्याच्या ऑर्डर घेऊशकता. तसेच बेकरीला देखील पुरवठा करू शकतात.( संदर्भ-udyogidea)
English Summary: cheese making business is get good profit so good oppurtunity to all farmer
Published on: 08 December 2021, 08:28 IST