Agriculture Processing

शेतकरी नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याच शेतकऱ्यांना चांगले उत्पादन (product) मिळणाऱ्या पिकांविषयी माहिती नसते. आज आपण अशाच भरघोस उत्पन्न देणाऱ्या पिकाविषयी माहिती घेणार आहोत.

Updated on 29 August, 2022 3:42 PM IST

शेतकरी नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याच शेतकऱ्यांना चांगले उत्पादन (product) मिळणाऱ्या पिकांविषयी माहिती नसते. आज आपण अशाच भरघोस उत्पन्न देणाऱ्या पिकाविषयी माहिती घेणार आहोत.

एरंड पिकाची लागवड (Cultivation of castor crop) शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. याला विशेष माती किंवा हवामानाची आवश्यकता नसते. त्यामुळे आजकाल एरंड लागवडीला जास्त प्राधान्य दिले जात आहे.

बरेच शेतकरी औषधी वनस्पतींची (medicinal plants) लागवड करत असून, सुगंध अभियानांतर्गत सरकारही या वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे. एरंडी हे देखील असेच एक पीक आहे ज्याला सरकार सतत प्रोत्साहन देत आहे. यातून शेतकऱ्यांना नक्कीच मोठा फायदा होईल.

Kisan Vikas Patra: किसान विकास पत्र योजनेतून शेतकऱ्यांचा पैसा होणार डबल; वाचा सविस्तर

एरंडाची लागवड

एरंड लागवड कोणत्याही प्रकारच्या मातीत किंवा हवामानात करता येते. फक्त शेतकरी ज्या शेतात पीक घेतो त्या शेतात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था चांगली असावी. इतर पिकांच्या तुलनेत एरंड लागवड खूपच स्वस्त आहे.

एरंडीची लागवड अशी करा

एरंडाची लागवड (Cultivation Castor) दोन प्रकारे करता येते. एक महानजे रोपवाटिकेत रोपे तयार केल्यानंतर त्यांची शेतात लागवड (Cultivation) करता येते. विशेष म्हणजे सीड ड्रिलद्वारेही बियाणे शेतात लावता येतात.

Maize Rate: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; मक्याचे दर तेजीत, मिळतोय 'इतका' दर

शेतासाठी हेक्टरी २० किलो बियाणे लागते. शेतकऱ्यांनी लावणीपूर्वी दोन-तीन वेळा नांगरणी केली तर पीक चांगले येते. तणांपासून पिकाची काळजी घ्या. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पीक लावणीनंतर (Crop planting) 120 ते 130 दिवसांत कापणीसाठी पीक तयार होते.

नफा किती होईल

शेतकऱ्याने एक हेक्टरमध्ये 25 ते 30 क्विंटल एरंडीचे उत्पादन घेतल्यास त्यांना जवळपास दीड ते दोन लाखांचा नफा सहज मिळू शकतो.

महत्वाच्या बातम्या 
Sweet Potato: रताळ्याचे सेवन केल्याने बीपी राहतो नियंत्रित; आणखी आहेत आश्चर्यकारक फायदे
Tur Market Price: तूर उत्पादकांसाठी महत्वाची बातमी; बाजारातील चित्र बदलले, मिळतोय 'हा' दर
Poultry Farming: 250 अंडी देणारी प्लायमाउथ रॉक कोंबडी पाळा; कमी खर्चात मिळणार जास्त नफा

English Summary: Castor Crop Cultivate amazing benefits
Published on: 25 August 2022, 01:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)