काजू प्रक्रिया उद्योग मध्ये व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यातली महत्त्वाचे गणित म्हणजे दीडशे रुपये कच्चा काजू पासून अंतिम उत्पादनाला 800 रुपये प्रति किलो दर मिळू शकतो. कमीत कमी गुंतवणूक करून चांगला नफा कमावण्याची संधी काजू उत्पादक पट्ट्यात सोबतच अन्य भागातील शेतकऱ्यांना आहेत.
भारतात प्रामुख्याने काजू प्रक्रिया उद्योग केरळ आणि कर्नाटक, महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारित झालेला आहे काजू ची किंमत प्रति किलो दीडशे रुपये असून अंतिम उत्पादनाची किंमत आठशे रुपये पर्यंत पोहोचते. काजूची अंतिम तयार उत्पादन 40 ते 56 किलोपर्यंत मिळते. अगदी सरासरी 600 रुपये मूल्यानुसार या प्रक्रिया उद्योगातून कच्चामाल ते प्रक्रियायुक्त उत्पादने द्वार दुपटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकते.
या उद्योगातील जमेची बाजू म्हणजे कच्चा काजूची साठवणूक दीर्घकाळापर्यंत करता येते. त्यामुळे देशाच्या इतर भागांपर्यंत ने आन ची प्रक्रिया सुलभ होते. स्थानिक पातळीवरील ग्राहकांना ताजे आणि चांगल्या दर्जाचे काजू उपलब्ध करता येऊ शकतात. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे प्रक्रिया अत्यंत सोपी असून, कमी व स्वस्त यंत्रसामग्री च्या साह्याने एका खोलीतून हा उद्योग सुरू करता येतो. या उद्योगांमध्ये जवळजवळ 90 टक्के काम महिलावर्ग करते. या उद्योगातील यांत्रिकीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. काजू हे विविध प्रकारे आहारात समाविष्ट आहेत. जसे की, खारवलेले काजू, काजू बर्फी, काजू करी इत्यादी. काजू उद्योगांमधील एक उपपदार्थ म्हणजे काजूच्या बोंडापासून तयार केलेला द्रव्य. या द्रव्य पदार्थाची रंग उद्योगांमध्ये मोठी मागणी आहे.
उत्पादन प्रक्रिया
काजू उत्पादनाची प्रक्रिया हे बऱ्यापैकी स्थिरावलेली आहे. यामध्ये कच्चे काजू सूर्यप्रकाशामध्ये वाळवून पोत्यामध्ये साठवण केली जाते. हे साठवलेले काजू नंतर बॉयलर मध्ये वाफेवर शिजवून मग केले जातात. या कामासाठी लहान आकाराचे बॉयलर उपलब्ध आहेत. वाफवलेल्या काजू बोंडा वरील आवरण कुशल मजुरांचा सहाय्याने हाताने चालवल्या जाणाऱ्या अवजाराने काढले जातात. आतला काजू पुन्हा कॅबिनेट ड्रायर मध्ये वाळवले जातात. नंतर त्यावरची लालसर साल काढली जाते. त्यानंतर काजू मिळतो या मिळालेल्या काजूचा रंग आणि कशाप्रकारे फुटला आहेत्यावरून त्याची प्रतवारी ठरवली जाते.या प्रक्रियेतून बाजूला पडलेल्या काजू आवरणातून द्रव्यपदार्थ मिळवता येतो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या प्रक्रिया केंद्रांना भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरण, 2006 चे निकष पाळावे लागतात. नवीन स्थापन केलेल्या प्रक्रिया केंद्रांनी संबंधित निकष पूर्ण करुन त्याबाबतीत चे लायसन घेणे बंधनकारक आहे.
- नवीन तंत्रज्ञानामध्ये कांदा बोंडापासून काजू तोडून वेगळे करण्याची यंत्र उपलब्ध आहे. काजूबोंड बॉयलरमध्ये तीस मिनिटे वाफेवर शिजवल्यानंतर पुढील सहा ते आठ तास मोकळा हवे मध्ये वाळ विण्यासाठी ठेवले जातात. त्यानंतर त्यावरील आवरण काढून जातील गुलाबी साली सह असलेला काजू वेगळा केला जातो. त्यानंतर पुन्हा वाळवून त्यातील आद्रता पाच टक्क्यांपर्यंत कमी केले जाते. ही प्रक्रिया ड्रायरमध्ये 60 अंश सेल्सिअस तापमानामध्ये सहा ते आठ तासांमध्ये पार पाडले जाते. त्यावरील साल सहजपणे वेगळी करता येते. स्वच्छ आणि चमकदार काजू मिळतो.
- 100 क्विंटल काजू बियांपासून 50 टक्क्यांपर्यंत काजू शकतो.
- एका युनिटमध्ये एक बॉयलर, एक स्टीमर, दोन कटर, एक डायर, 6 साल काढण्याचे यंत्र त्यांचा समावेश असतो. जमीन आणि खेळत्या भांडवलासाठी मोठी रक्कम लागू शकते.
- कच्च्या काजू ची किंमत दीडशे ते 170 रुपये प्रतिकिलो असून तयार काजूची किंमती 800 ते 850 रुपयांपर्यंत राहू शकते.
- तुम्ही लावलेल्या पंधरा हजार रुपयांच्या बदल्यात तुम्हाला 46 हजार रुपये मिळतात. त्याचे योग्य प्रकारे नियोजन आणि विक्री व्यवस्थापन केल्यास काजू प्रक्रिया उद्योगांमधून उद्योजकतेच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
- यासंबंधीचे प्रशिक्षण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यामध्ये उपलब्ध आहे.
Published on: 16 June 2021, 02:19 IST