महाराष्ट्रात कांदा हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आणि या कांद्याचे वर्षभराचे भाव बघता या पिकावर प्रक्रिया उद्योग उभे राहण्याची मोठी गरज आहे.
कांदा नैसर्गिक पद्धतीने जास्तीत जास्त आठ ते दहा महिने टिकतो, परंतु डीहायड्रेशन प्रक्रियेतून आपण याचा कार्यकाळ तसेच बाजार मूल्य वाढवून जास्तीत जास्त नफा कमवू शकतो.
1) काय आहे डीहायड्रेशन प्रक्रिया :-
डिहायड्रेशन या शब्दाचा मराठी अर्थ वाळवणे असा होतो, कांदा डीहायड्रेशन च्या प्रक्रियेत कांद्याचे बारीक तुकडे करून त्यांना उन्हामध्ये किंवा डीहायड्रेशन मशीनचा वापर करून वाळवले जातात. त्यानंतर ते वाळलेले तुकडे किंवा त्या तुकड्याची पावडर तयार करून बाजारात जास्त किमतीला विकली जाते.
2) भांडवल गुंतवणूक :- 1,50,000 हजार ते 5,00,000 लाख.
3) लागणारा कच्चा माल :- कांदा हा या उद्योगाचा मुख्य कच्चामाल असल्याकारणाने हा प्रक्रिया उद्योग कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रदेशात किंवा कांदा खरेदी विक्री केंद्राच्या जवळ चालू केल्यास वाहतूक खर्च कमी येईल.
4) कच्चामाल मिळण्याचे ठिकाण :- तुम्ही कांद्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत करार करू शकता किंवा तालुका बाजार समितीतून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांदा विकत घेऊ शकता.
5) मशिनरी :- जर आपण हा उद्योग छोट्या प्रमाणात चालू करणार असाल तर तुम्हाला, कांदा तुकडे करण्यासाठी कटिंग मशीन, वाढवण्यासाठी ड्रायर तसेच जर आपणास कांद्याची पावडर तयार करायची असेल तर ग्राइंडर मशीन व तयार माल पॅकिंग करण्यासाठी पॅकेजिंग मशीन लागेल. यामध्ये आपण आटोमॅटिक मशिनरी वापरून उत्पादन वाढवू शकतो.
नक्की वाचा:8 दिवस उरले! कृषी पंप विज धोरणाचा घ्या लाभ अन व्हा थकबाकी मुक्त, 31 मार्च शेवटची मुदत
6) मशिनरी किंमत :- सोलर ड्रायर Rs 65000 सुरुवात, ग्राइंडर मशीन Rs 8000, पॅकेजिंग मशिन 1500
7) मनुष्यबळ :- 2 ते 5
8) विक्री कशी कराल :- तयार माल आपण मसाले तयार करणाऱ्या कंपन्यांना विकू शकतो. तसेच हॉटेल मध्ये सुद्धा या उत्पादनाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. तरी आपण यांना हे उत्पादन रेगुलर पुरवू शकतो. वेफर तयार करणाऱ्या कंपन्यात कांदा पावडर वापरली जाते. त्यांच्यासोबत करार करता येईल.
( संदर्भ- उद्योग आयडिया)
Published on: 23 March 2022, 07:37 IST