पाण्याची बचत करण्यासाठी शेतकरी तुषार सिंचनाचा वापर (Application of frost irrigation) करीत असतात. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा वापर आणि योग्य प्रमाण माहिती नसते, त्यामुळे पाहिजे तसे उत्पादन घेता येत नाही. आज आपण तुषार सिंचनाचा वापराविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा (Micro irrigation system) अवलंब केला जातो. यात ठिबक सिंचन व तुषार सिंचन या पध्दतींचा वापर केला जातो. तुषार सिंचनाचा वापर करतांना शेतकर्यांनी कोणत्या पध्दतीने काळजी घ्यावी? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणार महत्वाची सुविधा
तुषार संच बसवण्यापूर्वी अशी काळजी घ्या
१) पाण्याच्या साठ्यात (irrigation) काडी कचरा जास्त असल्यास सक्शन पार्डपच्या फुट व्हाल्वला बारीक छिद्राची जाळी गुंडाळा.
२) तुषार पाईपाची जोडणी करताना एका पाईपचे टोक दुसर्या पाईप च्या कपलरमध्ये टाकताना, त्या टोकाला माती किंवा कचरा लागू नये याची काळजी घ्यावी.
३) अन्यथा त्यामुळे कपलरच्या रबरी रिंगाचे नुकसान होते. कपलर मधील रबरी रिंग बदलताना तिची दिशा फार महत्वाची असते. ती उलटी बसविल्यास जोडामधून पाणी गळत राहते.
सावधान! पुढील दोन दिवस 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
तुषार संच बसविल्यानंतर अशी काळजी घ्या
तुषार सिंचन पद्धतीत पाणी फवारून दिले जात असल्यामुळे हवेत बाष्पीभवनामुळे (Evaporation) होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तुषार पद्धत शक्यतो दुपारी चालवू नये. जास्त वेगाने वारा वाहत असल्यास जमिनीवर पाण्याचे समतोल वितरण होत नाही.
अशा वेळेस सकाळी किंवा सायंकाळी वारा मंद असताना तुषार संच चालवावा. यासाठी लॅटरल पाईपलाईन मधील व तुषार तोट्यातील अंतरात बदल करून देखील चालवणे शक्य आहे.
हंगामाच्या सुरुवातीला किंवा नेहमीच तुषार संच (frost set) चालू करताना, लॅटरल पार्डपचे बुच काढून ठेवावे व त्यातून काही वेळेसाठी पाणी बाहेर पडू द्या.
म्हणजे पाईपमधील कचरा किंवा इतर अडथळे निघून जातील आणि नंतर लॅटरल बंद करा. पंपाचा दाब जेवढ्या तोट्यांना पुरतो त्या पाण्याचा फवारा व्यवस्थित फेकला जाते तो पाहा.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो पीक नुकसानीबाबत माहिती भरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या
दिलासादायक! 'या' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन
आता दुधाचे उत्पादन होणार दुप्पट; 'या' जिल्ह्यात राबविण्यात येणार आनंद पॅटर्न प्रकल्प
Published on: 27 October 2022, 05:17 IST