कांदा हे भारतातील प्रमुख पीक असून ते मुख्यतः खरीप व रब्बी हंगामात पिकवली जाते. जागतिक भाजीपाला उत्पादन मध्ये कांदा तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील एकूण भाजीपाला उत्पादनामध्ये कांद्याचे प्रमाण सहा टक्के आहे. आपल्याला माहिती आहेच की कांद्याच्या दर हे कधी वाढतील व कधी उतरतील याची काही शाश्वती नसते
कांद्याच्या दरावर अधिक उत्पादन,शासनाचे निर्यात धोरण इत्यादीचा परिणाम होतो.त्यामुळे कांद्याचे दरकाही वेळा वाचले तर काही वेळा अत्यंत कमी होतात. यावर उपाय कांदा निर्जलीकरण हा किफायतशीर फायद्याचा मार्ग आहे.व्हाक्युम मायक्रोवेव्ह ड्राइंग, सोलर ड्राइंग इत्यादी तंत्राच्या मदतीने हवेचा वेग व तापमान नियंत्रित करून कांद्याचे मूल्यवर्धन केले जाते. प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित कांद्याचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व आहे. या लेखात आपण कांदा निर्जलीकरण नेमके काय आहे व फायदे जाणून घेणार आहोत.
कांदा निर्जलीकरण
- या प्रक्रियेमध्ये कांद्या मधील मुक्तपाणी बाष्पाच्या स्वरूपात काढले जाते. कांद्याचे सूक्ष्मजीव आणि पासून संरक्षण व्हावे यासाठी प्रक्रिया केले जाते.
- निर्जलीकरण केलेले कांदे हवाबंद कॅनमध्ये निर्यात केले जातात.
- योग्य वेस्टन व साठवणूक तापमान असल्यास 6 ते 12 महिने हे कांदे टिकतात.
- निर्जलीत कांद्यांना युरोप बाजारपेठेत प्रमुख मागणी आहे.
- निर्जलीत कांद्याच्या उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो.यासाठी मुख्यत्वे पांढरा कांदा वापरला जातो. उदा. बॉम्बे व्हाईट, पुसा व्हाइट,लाल कांद्याच्या प्रजातीमध्ये उदयपूर 101, पंजाब रेड इत्यादी.
- कांद्याचे काप,पावडर, फ्लेक्स तयार करण्यासाठी फ्लूडायझ्डबेड ड्राइंग पद्धत वापरली जाते. कांद्याचे 1.5 मी मी जाडीच्या आकाराचे काप करून 40,50 आणि 65 अंश सेल्सिअस तापमानाला ड्रायरमध्ये ठेवले जातात. या तापमानाला कांद्यातील आमल व साखर तीव्र स्वरूपात एकवटून सूक्ष्म जीवांपासून संरक्षित केले जाते.
- कांदा निर्जलीकरण यासाठी मायक्रोवेव हीजलद, सोपी, कार्यक्षम पद्धत आहे.या पद्धतीमुळे ऊर्जेची बचत तर होतेच शिवाय कमी भांडवल लागते.
Published on: 27 November 2021, 10:14 IST