सध्या बांबू लागवडीसाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. बांबू शेती ही तशी आर्थिक दृष्ट्या उपयुक्त आणि फायदेशीर आहे. तसेच बाबू पासून व्यापारी तत्त्वावर बऱ्याच वस्तू उत्पादित होतात.त्यामुळे बांबूचे महत्व आणखीनच वाढते. जर आपण बाबूचा विचार केला तर कागद उद्योग, प्लायवूड, फर्निचर उद्योग, पार्टिकल बोर्ड, कोळसा, विज अशा बऱ्याच उद्योगांमध्ये बांबूचा वापर केला जातो. बांबू चा अर्थव्यवस्थेत ही खूप मोठा वाटा आहे. त्यातील प्लायवूड उद्योग हा दरवर्षी वाढत जाणाराउद्योग असून सुमारे 26 हजार कोटी रुपयांचा आहे. त्यातील जवळजवळ पंचवीस टक्के तरी आपण बांबू प्लाय केला तरी खूप फरक पडू शकतो. वर उल्लेख केलेल्या सगळ्या उद्योगासाठी लागणारा कच्चामाल हा बहुतांशी शेतीतूनच येतो. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुख्य उत्पादन निर्माण करताना त्यातील फक्त 20 ते 25 टक्के एवढे मुख्य उत्पादन होऊ शकते. उदा. दर 100 किलो बांबू घेतला आणि त्यापासून प्लायवूड करायला गेलो तर फक्त वीस किलो प्लायवुड तयार होते. उर्वरित 80 किलो घटक हे प्लाय उद्योगाच्या दृष्टीने निरुपयोगी असतात. अशा उर्वरित घटकांचा उपयोग इतर उद्योगात करता येतो. परंतु बांबू मात्र याला अपवाद आहेत. बाबू मधील असे उर्वरित घटक कोळसा, ॲक्टिव्हेटेड कार्बन, विनेगार, बांबू बोर्ड उत्पादनांचा कच्चामाल आहे. त्यामुळे बांबू प्लाय निर्मिती बरोबरच सर्व पूर्वक उद्योग चालवले तर काहीही वाया जात नाही. या पूरक उद्योगातील मूल्यवर्धन होते.
चीन मधील बांबू उद्योग
चीनचे वैशिष्ट्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, स्पर्धे मध्ये कमी पैशात चांगली वस्तू निर्मिती करणे हे यशाचे खरे सूत्र आहे. बांबू वस्तू निर्मिती उद्योगात हे सूत्र प्रथम चीनने ओळखले आणि अमलात आणलं. एखादा कच्चामाल या उद्योगाला कामी येणार आहे तो योग्य त्या प्रतीचा, योग्य किमतीत, योग्यवेळी आणि आवश्यक तेवढा जर उद्योगाला मिळाला तर उद्योग सुस्थितीत चालतो.
प्लायवूड उद्योगा बद्दल थोडक्यात
बांबूच्या ठराविक झाडी आणि ठराविक लांबीच्या पट्ट्या हा प्लायवूड उद्योगातील कच्चामाल आहे. जर आपण 100 किलो बांबू घेतला तर त्यातून फक्त 20 ते 22 किलो पट्ट्या निघतात. पूर्वी 100 किलो बांबू घेऊन त्यावर प्रक्रिया करून 20 किलो कच्चा माल आणि 80 किलो कचरा जो की प्लायवूड साठी निरुपयोगी असायचा अशा प्रकारच माल तयार व्हायचा. त्यामुळे या निरुपयोगी मालाची विल्हेवाट लावण्यासाठी जास्त पैसा खर्च व्हायचा. त्यामुळे या जास्त खर्चाचा भार हा प्लाय वूड उद्योगावर पाडायचा. शिवाय अकुशल मजूर पोसावे लागायचे. बांबू आणणे आणि निरुपयोगी मालाची विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक खर्चही वाढायचा. या समस्येवर उपाय म्हणून चिनी तंत्रज्ञांनी प्री प्रोसेसिंग हे तंत्र वापरून हा प्रश्न सोडवला. ज्या पट्ट्यात बांबू लागवड मोठ्या प्रमाणावर होते अशा पट्ट्यात चीनमधील कंपन्यांनी प्री प्रोसेसिंग युनिट उभे केले. या युनिटमध्ये परिसरातील हिरवा बांबू आणला जातो. त्याची वर्गवारी करून तुकडे केले जातात.
या वर्गवारी मधील बांबूचा वरचा निमुळता आठ ते दहा फुटाचा तुकडा फळबागांना आधार देण्यासाठी विकला जातो. बांबू तील वाकडी तिकडी पेरे कापून चॉपस्टिक्स साठी बाजूला काढले जातात. सारख्या लांबीचे व झाडीचे बांबूचे तुकडे कापून त्याच्या पट्ट्या काढल्या जातात. हाच प्लाय निर्मितीसाठी चा कच्चामाल असतो. त्यावर थोडी प्रक्रिया करून व्यवस्थित वाळवून व पॅकिंग करून प्लाय उद्योगाला पाठवला जातो. प्लायवूड निर्मितीसाठी पट्ट्या करताना निघालेला भुसा हा पार्टिकल बोर्ड पॅलेट करण्याचा कच्चामाल असतो. या सगळ्या नियोजनामुळे उरलेला कच्चामाल संबंधित उद्योगांना पाठवला जातो. त्यामुळे प्लाय निर्मिती उद्योगासाठी योग्य तो कच्चामाल आवश्यकतेनुसार योग्य वेळी पोहोचतो. इतर राहिलेला कच्चामाल हा संबंधित उद्योगांना पाठवला जातो. म्हणून चीनच्या या तंत्रामुळे शेतकऱ्यांना बांबूची पूर्ण किंमत मिळते व उद्योगांना लागणारा कच्चामाल वेळेत मिळाल्याने असे उद्योग सुरळीत चालतात.
अगरबत्ती उद्योगाबाबत ही प्लाय उद्योगा सारखेच समस्या आहे. या उद्योगात 100 किलो बांबू मधून फक्त 18 ते 20 किलो अगरबत्ती ची काडी मिळते. उरलेला निरुपयोगी भाग कोळसा करून किंवा त्यापासून विनेगर किंवा ॲक्टिवेटेड कार्बन तयार करून उदबत्ती काडी निर्मितीचा उत्पादन खर्च कमी करणे शक्य झाले आहे.
आपल्याकडे बांबू निर्मिती उद्योगात संधी
जसे आपण चीनच्या धोरणाबद्दल पाहिले त्यामुळे तेथ पूरक उद्योगांचा विकास झाला. ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली. आपल्याकडे देखील अशा उद्योगांची उभारणी करणे शक्य आहे. त्यासाठी खाजगी उद्योगाबरोबरच शेतकऱ्यांना स्वतःच्या पूर्णपणे व्यापारी तत्त्वावर चालणाऱ्या कंपनी उभारावी लागतील. त्यासाठी अर्थसहाय्य म्हणून नाबार्ड, बँका, उद्योग मंत्रालय आणि वित्तीय संस्था पुढे येत आहेत. आज आपल्याकडे विविध पिकांच्या बाबतीत अनेक कंपन्या काम करीत आहेत. बांबू प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या कंपन्या निश्चित यशस्वी ठरतील व ग्रामीण स्तरावर रोजगार तर देतीलच परंतु खेड्यांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या हातात पैसा येईल यादृष्टीने का करतील तर ग्रामीण भागात तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. जर आपण आपल्याकडील पाण्याची मर्यादा ओळखून तुलनेने कमी खर्चात येणारे आणि अनेक वर्षे टिकणारे बांबू म्हणून आपल्याकडे स्वीकारल्यास चीन च्या तोडीस तोड उत्पन्न मिळू शकतो व त्याचबरोबर आपली आर्थिक स्थिती उंचावू शकतो.
Published on: 28 June 2021, 11:40 IST