तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो एक खास व्यवसायाबद्दल ज्या तुम्ही चांगली कमाई करू शकता हा आहे केळ्यांचा चिप्स व्यवसाय. हे चिप्स तब्येतीला चांगले असतात.
उपवासाला लोक हे चिप्स खातात. बटाटा चिप्स पेक्षा केळीच्या चिप्सला जास्त मागणी आहे.म्हणून ते जास्त विकले जातात.या चिप्सचा मार्केट साईज छोटा आहे. म्हणून शक्यतो ब्रँडेड कंपन्या या चिप्स बनवत नाहीत. म्हणून केळीच्या चिप्स ला जास्त मागणी आहे.
- केळीच्या चिप्स बनवण्यासाठी या सामानाची गरज :-
केळीचे चिप्स बनण्यासाठी विविध मशीन ची गरज लागते. कच्चामाल म्हणून कच्ची केळी, मीठ, खाण्याचे तेल इतर मसाले लागतील.काही महत्त्वाच्या मशीन्स पुढीलप्रमाणे
- केळी धुण्यासाठी टॅंक केळी सोडण्याचं मशीन
- केळीचेपातळ तुकडे कापण्याच मशीन
- केळ्यांचे तुकडे तळण्याचं मशीन
- मसाले मिसळण्याचा मशीन.
- पाउच प्रिंटिंग मशीन
- प्रयोगशाळेतील उपकरणे
- कुठून खरेदी करणार मशीन?
केळाच्या व्यवसायासाठी लागणारे मशीन्स https://WWW.INDIAMART.COM किंवाhttps//.INDIA.ALIBABA. COM/INDEX. HTMLया वेबसाईटवरून खरेदी करू शकता. हे मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4 हजार ते 5 हजार चौरस फूट जागेची गरज लागेल. या मशिनची किंमत 28 हजारापासून 50 हजारापर्यंत आहे.
- 50 किलो चिप्स बनविण्याचा खर्च :-
50 किलो चिप्स बनवण्यासाठी कमीत चिमणी 120 किलो कच्चा केळांची गरज आहे. 120 किलो कच्ची केळी तुम्हाला जवळजवळ एक हजार रुपयांना मिळतील.
याबरोबर 12ते 15 लिटर तेलाची गरज लागते. 15 लिटर तेल सत्तर रुपयाचा हिशेबाने 1050 रुपयांना पडेल. चिप्स फ्रायर मशीनला एक तासात 10 ते 11 लिटर डिझेल लागते. एक लिटर डिझेल ऐंशी रुपयाचा हिशोबाने 11 लिटर लागलो तर 900 रुपयाला पडेल.
मीठ आणि मसाले जास्तीत जास्त 150 रूपयांना पडतील. मग तुमचे 3200 रुपयांमध्ये 50 किलो चिप्स तयार होतात म्हणजे एक किलो चिप्सचपाकीट 70 रुपयांना पडेल तुम्ही ऑनलाईन किंवा किराणा दुकानात ते पाकीट 90 ते 100रुपयांना विकू शकाल.
- 1 लाख रुपयाचा फायदा :-
तुम्हाला 1 किलो वर 10 रुपयांचा फायदा होईल, असा विचार केला तर दिवसभरात 4 हजार रुपये कमवू शकता. तुम्ही महिन्यातले 25 दिवस तरी काम केलंत तरी महिन्याला 1 लाख रुपये सहज कमवू शकता.
Published on: 07 March 2022, 04:56 IST