फळे आणि भाजीपाला उत्पादक देशात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वर्षातील विशिष्ट भागांमध्ये योग्य प्रमाणात हाताळणी, वितरण, विपणन आणि नाशवंत फळे साठवण्याकरिता सुविधा नसल्याने आणि पायाभूत सुविधाचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात वाया जात आहे.
बेलफळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व्यावसायिकरित्या घेतले जात नाही आणि नाही मोठ्या प्रमाणावर व्यापार केला जातो. बेल मौसमी फळ आणि बाहेरील आवरण अतिशय टणक असल्यामूळे बेल फळला बाजारात मागणी नाही पण औषधीमूल्य, पौष्टिक, उपचारत्मक असलेल्या फळावर प्रक्रिया करून केलेल्या उत्पादनाला भविष्यात नक्कीच मागणी वाढेल. या दुर्लक्षित व मौल्यवान फळाची प्रक्रिया तंत्रज्ञान विकसित करणे आवशक्य आहे ज्यामध्ये दीर्घ काळ टिकतील असे वेगवेगळे मूल्यवर्धित उत्पादने आहेत. भविष्यात प्रक्रिया केलेल्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. अशी उत्पादने अतिशय पौष्टिक आणि उपचारत्मकदृष्ट्या महत्वाचे असल्याने देशाअंतर्गत व तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सहज लोकप्रिय होऊ शकतात. बेलफळावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे मूल्यवर्धित उत्पादने व्यापारिकदृष्ट्या तयार केली जातात त्यात प्रामुख्याने बेलाचा रस, पेय, मुरंबा, बेलाची पोळी, चूर्ण, मद्य, जेली, वडी इत्यादी उत्पादने बेलफळावर प्रक्रियारत आहेत.
बेल फळाचे मूल्यवर्धित उत्पादने:
लगदा / गर: |
|
बेलाचा रस: बेलफळच्या लगद्या पासून बेलफळाचा रस तयार करता येतो त्याकरिता लगद्यात पाणी, साखर, यांचा योग्य प्रमाणात उपयोग करून स्वादिष्ट रस तयार केला जातो. |
|
पेय (स्क्वॅश): |
|
बेलाचा मुरंबा: |
|
बेलाचा चूर्ण: |
संबंधित लेख वाचण्यासाठी: औषधी बेल फळ
बेलाचे नाविन्यपूर्ण पदार्थ:
कार्यात्मक पदार्थांमध्ये खाद्यपदार्थांचे पोषणमुल्य वाढवणे त्यामध्ये अनेक दुग्ध पूरक आहार आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश होतो. खाद्यान्न उद्योगांमधील प्रगतीमुळे अनेक पारंपारिक खाद्य पदार्थांना आता फायदेशीर घटक समाविष्ट करण्यात आले आहेत जे साध्या पोषणापेक्षा जास्त फायदे प्रदान करतील. अलीकडच्या वर्षांत, तथाकथित गैर-दुग्धजन्य आधारित प्रतिजैविक पदार्थाला खूप मागणी वाढली आहे कारण बहुतांश लोकांना दुग्धजन्य पदार्थापासून अहितकारक क्रिया निर्माण करणारी शरीराची आरोग्यविषयक स्थिती उत्पन्न होऊ शकते त्यामुळेच गैर- दुग्धजन्य आधारित प्रतिजैविक पदार्थाला कार्यात्मक पदार्थ म्हणून ओळखले जाते. बेल फळापासून तयार केलेले मूल्यवर्धित पदार्थ अनेक स्वरुपात उपलब्ध आहेत परंतु, नाविन्यपूर्ण पदार्थाचा विचार केल्यास बेल फळाचा उपयोग करून प्रतिजैविक चॉकलेट तयार करण्याकरिता प्रतिजैविक जीवाणूचा योग्य मात्रात सूत्रीकरण करून उत्तम दर्जाची व्यापारीकदृष्ट्या प्रतिजैविक चॉकलेट बनविता येते. प्रजैविक घटकामुळे आतड्यांमधील फायदेशीर सूक्ष्मजीवांच्या वाढीस उत्तेजन देणारे अनेक प्रजैविक अन्न घटक एकूण आहारातील तंतुमय अघुलनशील आणि विरघळ आहारातील तंतुमय (म्युसिलेज, इनुलीन, पेक्टिन) बेल फळात असल्याने त्याचा परिणामकारक परिणाम प्रतिजैविक चॉकलेटमध्ये दिसून येतो.
बेलाचे उपचारात्मक आणि औषधी मूल्य लक्षात घेता आणि या फळाच्या काढणी पश्चात नुकसानावर मात करण्यासाठी व्यावसायिकांना या दुर्लक्षित व मौल्यवान उष्णकटिबंधीय बेलफळाचा वापर विविध प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांमध्ये करणे गरजेचे आहे ज्यामुळे उत्पादकांना अधिक परतावा मिळेल आणि ग्राहकांना फायदेशीर ठरतील. बेलफळापासून तयार केलेल्या उपचारात्मक, उच्च पौष्टिक मूल्याच्या, स्वादयुक्त आणि आकर्षक नैसर्गिक पदार्थांची मागणी पूर्ण केल्यास सहजपणे देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोकप्रिय होऊ शकते.
के. आर. सवळे व प्रा. एच. डब्लू. देशपांडे
अन्न सूक्ष्मजीव आणि सुरक्षा विभाग, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
Published on: 12 September 2018, 05:14 IST