Agriculture Processing

अंजीर एक मधुर फळ आहे. हंगामात अंजीर फळे भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात. अंजिराचे अनेक पदार्थ टिकाऊ स्वरूपात बनवले जातात हे पदार्थ अत्यंत चवदार आणि सात्विक असतात.

Updated on 14 April, 2021 1:03 AM IST

अंजीर एक मधुर फळ आहे. हंगामात अंजीर फळे भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात. अंजिराचे अनेक पदार्थ टिकाऊ स्वरूपात बनवले जातात हे पदार्थ अत्यंत चवदार आणि सात्विक असतात.

आजच्या घाईगडबडीत च्या जीवनात दैनंदिन आहारामध्ये अंजिराचे काही पदार्थ वापरले तर आपल्या रोजच्या आहारात चांगलीच भर पडेल.  विशेष करून लहान मुले,  म्हातारी माणसे, आजारी माणसे यांना असा हा आहार चांगला चवदार आणि पूरक ठरतो.

अंजीर हे जगभर त्याच्या पाककृती तील आणि रोगनाशक गुणांसाठी मानले जाते. हे मधुर आणि कुरकुरीत फळ केवळ त्याच्याचवीसाठी प्रसिद्ध नसून हजारो वर्ष त्याच्या आरोग्य फायद्यांसाठी पिकवले आणि वापरले जात आहेत.  अंजीर हे पोषण दृष्ट्या पोस्टीक फळ आहे. तसेच ते औषधी आहे. ताजे अंजीर आत दहा ते 28 टक्के साखर असते.  अंजीर मध्ये पिष्टमय पदार्थ,  प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट,  कॅल्शियम,  फास्फोरस, लोह,  अ आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर थंड असले तर ते पचण्यास थोडे जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारा मध्ये किंवा मिठाई मध्ये वापरले जाते. पण सुके अंजीर पेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. ताजा अंजिराच्या सेवनानं पोषक घटक जास्त प्रमाणात मिळतात.

  मूल्यवर्धित पदार्थ

सुके अंजीर

  • पिकलेली चांगली ताजी फळे घ्यावीत, त्याचा टीएसएस 15 ते 18 टक्के असावा.

  • निवडलेली फळे स्वच्छ पाण्याने धुऊन मसलीन कापडामध्ये बांधून एक टक्के कॅल्शियम बायकार्बोनेट च्या पाण्यात 20 ते 30 मिनिटे ठेवावीत.

  • फळे थंड करून ड्रायरमध्ये एकसमान पसरून 55 ते 65 अंश सेल्सिअस तापमानाला दोन दिवस ठेवावे.

  • फळातील पाण्याचे प्रमाण 15 ते 20 टक्के झाल्यास फळे सुकली आहेत असे समजावे.

  • सुकलेली फळे काढून थंड करून ते दाबून घ्यावी. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये टेक करावीत.

  • पाच किलो ताज्या अंजिरापासून साधारणतः 500 ते 700 ग्रॅम सुके अंजीर मिळतात.

       

रस

  • दहा टक्के अंजिर गराचा टीएसएस दहा टक्के असतो आणि यामध्ये 0.1 ते 0.3 टक्के आम्लं असते.

  • एक लिटर गाळून घेतलेल्या गरमध्ये एक किलो साखर आणि एक ते तीन ग्रॅम सायट्रिक आम्ल व 9 लिटर पाणी मिसळून घ्यावे.

  • बनवलेले मिश्रण मंद आचेवर पाच मिनिटे गरम करून थंड करून घ्यावे.  थंड केलेले आरटीएस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे.

अंजीर कॅन्डी

 पिकलेली चांगली फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. नंतर कॅल्शियम बायकार्बोनेट पाण्यात चार तासटाकून ठेवावेत, साखरेची एक तारी पाक तयार करावा व थंड झाल्यावर त्यामध्ये अंजीर कोरडे करून टाकावेत व एक रात्र तसेच ठेवावेत. दुसऱ्या दिवशी साखरेच्या पाकातून अंजीर काढून तो 52 तारीख करावा व थंड करून त्यात अंजीर टाकावे. तिसऱ्या दिवशी तीन तारी पाक तयार करून त्यात अंजीर सायट्रिक ऍसिड व सोडियम बेंजोएट टाकावे व रात्रभर तसेच ठेवावे. त्यानंतर चाळणी द्वारे पाक निचरा करून घ्यावा.  या साखर अंजिराला पाकळ्या सूर्यप्रकाश किंवा सौर वाळवणी यंत्रामध्ये एक ते दोन दिवसांसाठी वाळवून घ्यावेत. त्या अधिक वाळवून कोरड्या केल्यास कडक  होण्याचा धोका असतो..

 

   पोळी

  • पिकलेली चांगली निरोगी फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत.

  • फळांची देठे काढून बारीक फोडी करून मिक्‍सरमधून बारीक करून घ्याव्यात.

  • मिक्सर मधून काढलेला गर मसलीन  कपडा मधून गाळून घ्यावा.

  • एक किलो गरामध्ये दीडशे ते दोनशे ग्रॅम साखर व पाच ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे शिजवावे.

  • शिजवलेले मिश्रण ट्रेमध्ये एकसमान पसरून वळवण्यासाठी ठेवावे.

  • वाळलेली अंजीर पोळी तुकडे करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवावे.

जॅम

  • 45% अंजीर गराचा टीएसएस 68 टक्के असतोआणि यामध्ये 0.5 ते 0.6 टक्के आम्ल असते.

  • एक लिटर गाळून घेतलेल्या गरामध्ये 750 ग्रॅम साखर आणि पाच ते सहा ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून स्टीलच्या पातेल्यात मध्ये मंद आचेवर शिजवावे.

  • मिश्रण विरघळेपर्यंत आणि घट्ट द्रव्य होईपर्यंत हलवत राहावे. घट्ट झालेले मिश्रण चाचणी करून निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून सीलबंद करावे.

English Summary: Anjeer fruit processing and value added foods
Published on: 14 April 2021, 01:03 IST