शेतकरी बंधूनी शेती करीत असताना शेतीशी संबंधित असलेल्या विविध व्यवसाय उभारणे ही काळाची गरज आहे. कारण आपण शेतीचा विचार केला तर निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीचे खूप मोठे नुकसान होते. परिणामी शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे शेती करणे तर आपले प्रथम कर्तव्य आहेच परंतु शेतीला सोबत शेतीशी संबंधित असणारे प्रक्रिया उद्योग उभारणी ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बाब ठरू शकते.
जर आपण विचार केला तर शेतीच्या संबंधित विविध प्रकारचे प्रक्रिया उद्योग आहेत. बहुतांशी प्रक्रिया उद्योगांचा विचार केला तर यासाठी लागणारा कच्चामाल हा शेतीतच तयार होणारा असतो.
त्यामुळे अशा प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक प्रगती चांगल्या प्रकारे पुढे नेता येऊ शकते. त्यामुळे आपल्या लेखामध्ये असाच शेतीशी संबंधित एका प्रक्रिया उद्योगाची माहिती घेणार आहोत.
कोरफड प्रक्रिया उद्योग अर्थात एलोवेरा प्रोसेसिंग युनिट
कोरफड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जर आपण कोरफडीचा विचार केला तर एक औषधी वनस्पती असल्यामुळे बाजारपेठेत कायम मागणी असणारे हे पीक आहे. परंतु अजून देखील कोरफडीची लागवड हव्या त्या प्रमाणात होत नाही.
परंतु जर शेतकरी बांधवांनी कोरफड लागवडी सोबतच कोरफड प्रक्रिया उद्योग अर्थात एलोवेरा प्रोसेसिंग युनिट उभारला तर नक्कीच त्यांना शेतीसोबत खूप मोठी आर्थिक प्रगती करण्याची संधी उपलब्ध होईल. जर आपण कोरफडीचा विचार केला तर कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारे हे पीक असून विशेष म्हणजे या पिकावर कुठल्याही प्रकारची कीड व रोगाचा प्रादुर्भाव सहसा होत नाही.
कोरफडीमध्ये जे काही जेल असते त्याचा वापर हा विविध उत्पादनांमध्ये केला जातो. जर आपण कोरफडीचा वापर याचा विचार केला तर अनेक प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीमध्ये कोरफड जेल आणि ज्युसचा वापर केला जातो.
तसेच आरोग्याच्या बाबतीत देखील ते उपयुक्त आहे. त्यामुळे कोरफड लागवड सोबतच कोरफड वर प्रक्रिया करणारा युनिट उभारणे खूप महत्त्वाचे आहे.
कोरफड प्रक्रिया
1- यामध्ये सगळ्यात आगोदर कोरफड पाण्यामध्ये पोटॅशियम मिसळला जातो व ती धुऊन स्वच्छ केली जाते.
2- त्यानंतर कोरफडीची लहान लहान तुकडे गरम पाण्यात टाकून सोडले जातात.
3- या प्रक्रियेनंतर कोरफडीतून जेल काढण्याची प्रक्रिया केली जाते. जेल काढल्यानंतर ते ब्लेडींग मशीन मध्ये टाकून सत्तर अंशापर्यंत गरम केले जाते.
4- नंतर त्यापासून तयार केलेला रस प्रिझर्वेटिव्ह मध्ये मिसळला जातो व फ्रीजमध्ये थंड केला जातो.
5- प्रिझर्वेटिव्ह मुळे जास्त काळ टिकतो.
नक्की वाचा:Business Tips: बाजारपेठेचे गाव असेल तर 'हे' व्यवसाय देऊ शकतील आर्थिक समृद्धी,वाचा सविस्तर
या उद्योगासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी
1- कोरफड ज्यूस प्रोसेसिंग युनिट स्थापन करण्यासाठी व्यवसाय परवाना आणि काही आवश्यक कागदपत्रे मिळवणे देखील गरजेचे आहे.
2- सर्वात प्रथम तू जेव्हा तुम्ही कोरफड प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याचा विचार कराल तेव्हा त्या माध्यमातून तुम्ही जेल, ज्युस किंवा सौंदर्यप्रसाधने यापैकी काय बनवणार आहात हे ठरवणे गरजेचे आहे.
3- त्यानुसार तुम्हाला जो काही युनिट उभारायचा आहे त्यानुसार तुमच्या व्यवसायाची नोंदणी करावी लागते.
4- तसेच फॅक्टरी परवान्यासाठी तुम्हाला राज्य प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागतो व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र देखील लागते.
5-या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर तुम्ही युनिट सुरू करू शकतात.
6- एलोवेरा प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी तुम्हाला पाच लाख रुपये पर्यंत अंदाजित खर्च अपेक्षित आहे.
या उद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्री
1- यासाठी तुम्हाला शेतांमधून कोरफडीची पाने आणण्यासाठी कूलिंग वॅन लागते.
2- तसेच कोरफड जेल मॅन्युफॅक्चरिंग युनिट
3- तयार जेल पॅकबंद बाटल्यांमध्ये भरण्यासाठी लागणारी यंत्र
4- तसेच जेल तपासणी अर्थात चाचणी उपकरणाची आवश्यकता भासते.
नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो 'या' तारखेपासून भुईमुगाची पेरणी करा; मिळेल भरघोस उत्पादन
Published on: 07 October 2022, 05:06 IST