Rain News : मान्सूनची वाटचाल देशात सध्या वेगाने होताना दिसत आहे. यामुळे राज्याच्या समुद्र किनारी भागात अर्थातच कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील पाच दिवसांत कोकणात आणि राज्याच्या इतर भागात पावसाचा जोर वाढणार आहे. यासोबतच कर्नाटक तामिळनाडू, पुडुचेरी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
१० तारखेदरम्यान कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. महाराष्ट्र आणि किनारी कर्नाटकात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आहे.
मराठवाडा, कोकणात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छ, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, रायलसीमा, तेलंगणा पावसाचा अंदाज आहे.
दक्षिण भारतातील रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल, किनारी आंध्रप्रदेश भागात देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, उत्तराखंड, आसाम आणि मेघालय भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अरबी समुद्रातून मान्सून पुढे सरकत आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सूनने प्रगती केली आहे. तसंच तेलंगणा आणि किनारी आंध्र प्रदेशच्या बहुतेक भागात देखील मान्सूनने चांगली प्रगती केली आहे. तसंच मान्सूनला पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
ईशान्य भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम राज्यात पुढील ५ दिवसात पावसाची शक्यता आहे.
Share your comments