1. हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात तापमान घटते; थंडीचा जोर वाढणार

Weather News : उत्तर भारतातील वातावरणाचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला आहे. यामुळे राज्यातील थंडीवर याचा देखील परिणाम झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस गारठा कायम राहणार आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्र आणखी गारठणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

Weather Update : उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. तसंच उत्तरेकडील वारे महाराष्ट्रात वाहत असल्याने तापमानाचा पारा घटल्याने राज्यात गारठा जाणवत आहे. राज्यातील तापमान देखील मागील काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातील तापमान १० अंशांच्या खाली असल्याने थंडीचा अद्यापही कायम आहे.

उत्तर भारतातील वातावरणाचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला आहे. यामुळे राज्यातील थंडीवर याचा देखील परिणाम झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस गारठा कायम राहणार आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्र आणखी गारठणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

राज्यातच्या बहुतांश भागातील तापमान १० अंशांच्या खाली आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमान १० ते १८ अंशांच्या घरात राहणार आहे. निफाड आणि धुळ्यामध्ये थंडीचा कडाका सर्वाधिक जाणवणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि कोकण पट्ट्यामध्येही पहाटेच्या वेळी धुकं आता पाहायला मिळत आहे.

दरम्यान, हरियाणा, पंजाब, चंदीगढ, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांत धुक्याची चादर पसरलेली आहे. ज्यामुळं रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर याचे थेट परिणाम होताना दिसत आहे.

English Summary: Maharashtra Weather Update Temperature drops in the state The force of cold will increase Published on: 19 January 2024, 11:10 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters