1. हवामान

Maharashtra Rain: सावधान! राज्यात पावसाचा वेग वाढला; हवामान विभागाकडून आज संपूर्ण महाराष्ट्रात 'यलो' अलर्ट जारी

मागच्या काही दिवसांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा या 2 दिवसात पावसाने थैमान घातले आहे. विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने (meteorological department) दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Meteorological department

Meteorological department

मागच्या काही दिवसांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा या 2 दिवसात पावसाने थैमान घातले आहे. विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने (meteorological department) दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

रात्रभर मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. या पावसामुळे (rain) अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच राज्यातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, हिंगोली, वाशिम, पालघर, यवतमाळ, लातूर या जिल्ह्यांना देखील पावसाने हजेरी लावली आहे.

आजही हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज संपूर्ण राज्यात पावसाने यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आहे. येणाऱ्या 4 ते 5 दिवसात राज्यात गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात मोठा फटका; गव्हाच्या किंमतीत 4 टक्यांनी वाढ

मुंबईमध्ये पावसाची जोरदार हजेरी

मुंबई आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (rain) झाला आहे. रात्रभर देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. पुन्हा सकाळपासून पाऊस सुरु आहे. मुंबईसह, ठाणे, डोंबिवली आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला. मुंबईतील हिंदमाता परिसरात पावसामुळे सखर भागात पाणी साचले आहे.

आज मुंबईत यलो अलर्ट (yellow alert) जारी करण्यात आला आहे. तर पुढचे काही दिवस पावसाच्या मध्यम किंवा हलक्या सरी बरसणार असल्याचे हवामान विभागाने सांगितलं आहे.

Gold price today! सोने- चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन किंमती...

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने (rain) आठवडाभरात दुसऱ्यांदा हाहाकार केला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यात सोयाबीन आणि भात कापणीला वेग आला असतानाच पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जयसिंगपूर, इचलकरंजी तसेच असळज-गगनबावडा भागामध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. कुंभी नदीवरील रेव्याचीवाडी, कातळी बंधारे पाण्याखाली गेले आहे.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; पहिल्याच दिवशी कापसाला मिळाला 11 हजारांचा भाव
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मिळणाऱ्या नुकसान भरपाईत मोठी वाढ; मिळणार २० लाख रुपयांची मदत
'या' 4 पालेभाज्या रोजच्या आहारात खा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त

English Summary: Maharashtra Rain Meteorological department yello alert Maharashtra today Published on: 08 October 2022, 09:33 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters