1. यशोगाथा

काय सांगता! शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतीतून मिळवले 8 कोटी, कृषीमंत्र्यांनी घरी जाऊन केले कौतुक

अनेकदा आपण बघत असतो की टोमॅटो हा रोडवर शेतकरी फेकून देत असतात. याच्या व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात, आता मात्र एका शेतकऱ्याने टोमॅटोमधून ८ कोटी कमवले असे म्हटले तर तुम्हाला खोटे वाटेल मात्र ते खरे आहे. यामुळे या शेतकऱ्याची सध्या देशात चर्चा सुरु आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
tomato

tomato

अनेकदा आपण बघत असतो की टोमॅटो हा रोडवर शेतकरी फेकून देत असतात. याच्या व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात, आता मात्र एका शेतकऱ्याने टोमॅटोमधून ८ कोटी कमवले असे म्हटले तर तुम्हाला खोटे वाटेल मात्र ते खरे आहे. यामुळे या शेतकऱ्याची सध्या देशात चर्चा सुरु आहे. याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यानी देखील या शेतकऱ्याची भेट घेतली आहे. मध्य प्रदेशातील या शेतकऱ्याने यावर्षी ८ कोटीचे टोमॅटो विकल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश राज्याचे कृषिमंत्रीही त्यांच्या घरी गेले आहेत. अनेकजण त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले आहेत. मधुसूदन धाकड हे १४ वर्षांपासून शेती करत असून त्यांनी शेतीची पद्धत बदलून हे स्थान मिळवले आहे.

राज्याचे कृषी मंत्री कमल पटेल हरदा जिल्ह्यातील सिरकंबा गावात शेतकरी मधुसूदन धाकड यांची मुलाखत घेण्यासाठी पोहोचले. जिथे त्याने या शेतकऱ्याकडून या टोमॅटोची प्रत्येक माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी यामध्ये कशाप्रकारे लागवड केली खते कोणती वापरली याबाबत देखील माहिती जाणून घेतली. यावर होणारा खर्च याची देखील सगळी माहिती घेतली. याबाबत असे उत्पन्न कमवणारे ते एकमेव शेतकरी असतील, असेही म्हटले जाते. ते आपल्या शेतात सतत वेगवेगळे प्रयोग करत असतात.

मधुसूदन धाकड सांगतात की त्यांनी 60 एकरात मिरची, 70 एकरात टोमॅटो आणि 30 एकरात आल्याची लागवड केली आहे. त्याचबरोबर त्यांनी गहू आणि सोयाबीनसारखी पारंपरिक पिके घेणे सोडून दिले आहे. त्यामध्ये त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. यामुळे आता त्यांना याचा मोठा फायदा होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आता आधुनिक शेतीकडे वळाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांची ही शेती बघण्यासाठी अनेक शेतकरी भेट देत असतात. यामध्ये ते त्यांना मार्गदर्शन देखील करतात.

आता विशेष म्हणजे 70 एकरात टोमॅटो पिकवून त्यांना 8 कोटींपर्यंतचा त्यांना नफा झाला आहे. त्यामुळे कृषीमंत्र्यांना त्यांची पावले थांबवता आली नाहीत आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांचे घर गाठले. यामुळे सध्या त्यांची खूपच चर्चा रंगली आहे. त्यामुळे त्यांचे जीवनच बदलून गेले आहे. शेतकऱ्यांना कधी चांगले पैसे मिळतील आणि कधी नाही हे कोणीही सांगू शकत नाही, अनेकदा लाखो रुपये खर्च करून देखील त्यांना एकही रुपया मिळत नाही. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या देखील करतात, मात्र काही शेतकरी नवीन प्रयोग करून चांगले पैसे कमवतात.

English Summary: What do you say Farmers get Rs 8 crore from tomato farming, Agriculture Minister goes home and appreciates it Published on: 31 January 2022, 11:52 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters