Business Idea Marathi: सध्या देशातील नवयुवक नोकरींपेक्षा अधिक व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. अनेक नवयुवकांना हजारो रुपयांची नोकरीं करून दुसऱ्याचे नोकर बनण्यापेक्षा आता स्वतःचा व्यवसाय करणे अधिक पसंत पडत आहे. मात्र असे असले तरी अनेक नवयुवकांना व्यवसायाची योग्य ती कल्पना सुचत नसल्याने व्यवसाय सुरु करता येतं नाही.
यामुळे आज आपण आपल्या वाचक मित्रांसाठी नेहमीप्रमाणेच आज देखील एका भन्नाट व्यवसायाची कल्पना घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आम्ही बारामाही मागणी असलेल्या आणि भारतातील कुठल्याही क्षेत्रात सुरू करता येणाऱ्या एका भन्नाट व्यवसायाविषयी जाणुन घेणार आहोत.
आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो आहे पाण्याचा व्यवसाय. मित्रांनो आज आपण ड्रिंकिंग वॉटर व्यवसाय कसा सुरु करायचा याविषयी जाणुन घेऊया.
पाण्याचा व्यवसाय
'पाणी हे जीवन आहे' असे म्हणतात, पण वाढत्या प्रदूषणामुळे पाणी प्रदूषित होत आहे. आता हे पाणी पिण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा लागतो. कारण प्रत्येकाला आरोग्यची काळजी असते. दूषित पाण्यामुळे आपल्या आरोग्याला त्रास होऊ नये असे प्रत्येकाला वाटते. अशा परिस्थितीत, आजकाल बहुतेक लोक फक्त बाटली किंवा आरओचं पाणी पिणे पसंत करतात.
यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. तुम्हाला सर्वत्र बाटलीबंद पाणी मिळेल, कोणत्याही दुकानातून ते विकत घेऊन तुम्ही पाण्याची तहान सहज भागवू शकता. रेल्वे स्टेशन असो की विमानतळ, सगळीकडे पाण्याची बाटली बघायला मिळते. या व्यवसायाची हिच मागणी लक्षात घेता हा व्यवसाय अल्पकालावधीतच चांगला बक्कळ पैसा कमवून देऊ शकतो.
व्यवसाय कसा सुरू करायचा
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 1 हजार चौरस फूट जागा लागेल. याशिवाय पाणी फिल्टर करण्यासाठी आरओ प्लांट लावावा लागेल. मात्र, आरओ प्लांट बसवल्यानंतर सर्वप्रथम आयएसआय प्रमाणपत्रही घ्यावे लागणार आहे. एवढेच नाही तर व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीची नोंदणी देखील करावी लागेल.
तुमचा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मार्केटिंग खूप महत्वाचे आहे, तुम्हाला तुमच्या ब्रँडचे चांगले मार्केटिंग करावे लागेल. मार्केटिंगसाठी तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू शकता. याशिवाय आपण रेडिओ किंवा वर्तमानपत्रात छोटी जाहिरातही देऊ शकता.
तुम्ही पोस्टर बनवून बाजारात लावू शकता. तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवरही पाणीपुरवठा करू शकता. यासाठी तुम्ही 5 लोकांना कामावर ठेऊ शकता, जे पंचक्रोशीत फिरून पाणी विकू शकतात.
Share your comments