1. इतर बातम्या

पेट्रोल डिझेलचे दर जाहीर! डिझेल 79.74 रुपये तर पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर...

Petrol Diesel Price Today: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट विसकडले आहे. भारतीय तेल कंपन्यांकडून आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. ७७ व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

petrol diesel

petrol diesel

Petrol Diesel Price Today: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट विसकडले आहे. भारतीय तेल कंपन्यांकडून (Indian Oil Companies) आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. ७७ व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

म्हणजेच आजही तेजचे भाव स्थिर आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या, ब्रेट क्रूड (Crude Oil) प्रति बॅरल सुमारे $100 आहे. यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली. सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. देशात सर्वात कमी दरात पेट्रोल आणि डिझेलचे पोर्टब्‍लेयर मध्ये मिळत आहे. पेट्रोल 84.10 रुपये तर डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर मिळत आहे.

भारीच की ! 25 पैशांच्या नाण्यांच्या बदल्यात मिळतायेत 40 हजार; असा घ्या लाभ...

मुख्य शहरातील आजचे दर

दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

दिलासादायक! खाद्यतेलाच्या किमतीत होऊ शकते इतक्या रुपयांनी घट; जाणून घ्या...

बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.
तिरुवनंतपुरम : पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर : पेट्रोल १०३.१९ रुपये आणि डिझेल ९४.७६ रुपये प्रति लिटर.
चंदीगड : पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर.
लखनौ : पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर.
नोएडा : पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर.
जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.
पाटणा : पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर
गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.

यामुळे वाढले आहेत दर

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.

महत्वाच्या बातम्या:
IMD Alert: या राज्यांमध्ये धो धो पाऊस बरसणार! हवामान खात्याने दिला अति मुसळधार पावसाचा इशारा
सोन्या चांदीच्या दरात घसरण! चांदी 21923 रुपयांनी घसरली; जाणून घ्या नवीनतम दर...

English Summary: Petrol diesel rates announced! (1) Published on: 05 August 2022, 09:59 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters