1. इतर बातम्या

गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता एका वर्षात मिळतील 'इतके'सिलेंडर, वाचा डिटेल्स

घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली असून आता ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असून नवीन नियमानुसार आता एका कनेक्शनसाठी वर्षभरात केवळ पंधरा सिलेंडर मिळणार आहेत. आता ग्राहकांना पंधरापेक्षा जास्त सिलेंडर एका वर्षात दिले जाणार नाहीत व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एका महिन्याचा कोटा देखील आता मर्यादित करण्यात आला असून एका महिन्यात दोन पेक्षा जास्त सिलेंडर कोणत्याही ग्राहकाला मिळणार नाहीत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
gas cyllinder new rule

gas cyllinder new rule

घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली असून आता ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असून नवीन नियमानुसार आता एका कनेक्शनसाठी वर्षभरात केवळ पंधरा सिलेंडर मिळणार आहेत.

आता ग्राहकांना पंधरापेक्षा जास्त सिलेंडर एका वर्षात दिले जाणार नाहीत व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एका महिन्याचा कोटा देखील आता मर्यादित करण्यात आला असून एका महिन्यात दोन पेक्षा जास्त सिलेंडर कोणत्याही ग्राहकाला मिळणार नाहीत.

नक्की वाचा:Gold Silver Price: सोने चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोने 6695 रुपयांनी तर चांदी 25400 रुपयांनी स्वस्त...

जे ग्राहक विनाअनुदानित कनेक्शन वापरतात असे ग्राहक केव्हाही आणि वर्षभरात कितीही सिलेंडर घेऊ शकत होते परंतु आता या नवीन नियमानुसार फक्त पंधरा सिलिंडर ग्राहकांना मिळणार आहेत. याबाबत वितरकांनी दिलेली माहिती अशी आहे की सिलेंडर संदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअर मध्ये बदल करण्यात आला

असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्‍यात आली आहे. अनुदानित जे काही घरगुती गॅस आहे त्यांचे रिफील हे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या रिफीलच्या तुलनेमध्ये महाग असल्याने अनेकदा व्यावसायिक वापरासाठी  घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जात होता व या संबंधीच्याअनेक तक्रारी समोर येत असल्याने आता घरगुती एलपीजी सिलिंडरवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नक्की वाचा:कर्मचाऱ्यांचा पगार एवढा वाढला, पाहा कोणाला मिळाला फायदा

 12 अनुदानित सिलेंडर मिळणार

 तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला असून अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्यांना वर्षभरात 12 सिलिंडर मिळणार असून या पेक्षा जास्त सिलेंडर ची आवश्यकता भासल्यास अनुदान नसलेल्या सिलिंडर ग्राहकांना घ्यावे लागणार आहे.

वर्षाकाठी पंधरा सिलेंडर

 या रेशनिंग अंतर्गत एका कनेक्शनवर एका महिन्यात दोन सिलिंडर तर एका वर्षात पंधरापेक्षा जास्त सिलेंडर मिळणार नाहीत.

नक्की वाचा:Aadhaar Update: आधारचा गैरवापर टाळण्यासाठी सरकार उचलत आहे मोठे पाऊल, वाचा माहिती

English Summary: now get fifteen gas cylinder in one yeaqr and get two cylinder in month Published on: 29 September 2022, 12:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters