1. इतर बातम्या

Hero HF Deluxe: हिरो एचएफ डीलक्स बाईक आता मिळणार फक्त 5 हजार रुपये डाउनपेमेंट वर

हिरो देशातील एक अग्रगण्य मोटोकोर्प कंपनी आहे, या कंपनीची एचएफ डीलक्स ही बाईक कंपनीची टॉप सेलिंग बाईक पैकी एक आहे. या गाडीची देशभरात मोठ्या प्रमाणात खपत होत असते. या गाडीच्या स्टायलिश लुक मुळे आणि दमदार मायलेजमुळे मध्यमवर्गीय लोकांची ही बाईक पहिली पसंत बनत आहे. कंपनीने या गाडीवर आता एक भन्नाट ऑफर काढली आहे. त्यामुळे ही बाईक आता केवळ पाच हजार रुपये डाऊन पेमेंट भरून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. म्हणून या गाडीच्या चाहत्यांना ही बाईक खरेदी करण्यासाठी मोठ्या सोयीचे होणार असल्याचे सांगितले जात आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Hero Hf Deluxe

मित्रांनो जर आपणासही या बाईकची खरेदी करायची असेल तर आपल्या जवळच्या डीलर सोबत आपण या ऑफर विषयी नक्कीच विचारणा करा, आणि एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे ही ऑफर कंपनीद्वारे लिमिटेड कालावधीसाठी देण्यात येत आहे. हिरो कंपनीची हिरो एचएफ डीलक्स ही बाई पाच हजार रुपये डाऊन पेमेंट भरून ग्राहकांना दिली जाणार आहे तसेच यावर कंपनीद्वारे लो कॉस्ट इएमआय देखील कंपनीद्वारे दिले जात आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हिरो स्प्लेंडर नंतर देशात सर्वात जास्त हिरो एचएफ डीलक्स बाईक ची विक्री होत असते. हिरो स्प्लेंडर भारतवासीयांना विशेषतः मध्यमवर्गीय लोकांना विशेष पसंत येत आहे त्यामुळे कंपनीने मागील महिन्यात या गाडीचे जवळपास दोन लाख युनिट विक्री केले होते हिरो स्प्लेंडर नंतर हिरो एचएफ डीलक्स या गाडीची देखील कंपनीने दीड लाख युनिट विक्री केली असल्याचे सांगितले जात आहे.

हिरो कंपनीची एचएफ डीलक्स बाईक आपल्या दमदार लोक मुळे आणि जबरदस्त मायलेज मुळे नेहमीच मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंत ठरली आहे. कंपनीच्या मते ही गाडी 83 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे दमदार मायलेज देण्यास सक्षम आहे. या बाइकची लांबी 1965 मिमी, रुंदी 720 मिमी आणि उंची 1045 मिमी आहे. या बाइकचा व्हीलबेस 1235 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 165 मिमी आहे. या गाडीच्या या जबरदस्त स्पेसिफिकेशनमुळे ही गाडी टुविलर सेगमेंटमध्ये मोठा धुमाकूळ घालत आहे. Hero HF Deluxe मध्ये 97.2cc, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक सिंगल-सिलेंडर OHC इंजिन आहे जे 8000 rpm वर 8.24 bhp पॉवर आणि 5000 rpm वर 8.05Nm टॉर्क जनरेट करते. 

या बाईकच्या इंजिनला 4-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत, त्यामुळे ही गाडी दमदार परफॉर्मन्स देण्यासाठी सक्षम आहे. या गाडीच्या सुरुवातीच्या व्हेरीयंटची एक्स शोरूम किंमत 54000 एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र जर आपल्याकडे वन टाइम पेमेंट करण्यासाठी एवढी मोठी रक्कम उपलब्ध नसेल तर आपण पाच हजार रुपये डाऊन पेमेंट उर्वरित रक्कम हप्त्याने देऊ शकता.

English Summary: hero hf deluxe is at 5000 downpayment Published on: 23 February 2022, 07:33 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters