पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत अशात लोक सीएनजीकडे वळाले होते, पण सध्या सीएनजीचे दरही वाढत आहेत. नाशिक शहरात मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांना सीएनजीसाठी प्रतिकिलो ८६ रुपये मोजावे लागणार आहेत. एकीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत.
किराणा माल, खाद्यतेल, भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेल नवीन उंची गाठत असताना नाशिकमध्ये नैसर्गिक वायूच्या (सीएनजी) दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे. हे नवे दर शनिवारी (दि. २१) सकाळी ६ वाजल्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबरोबरच सीएनजी वाहनधारकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
एकीकडे अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारने सीएनजीवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात करण्याची घोषणा केली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेकांनी आपले लक्ष सीएनजीकडे वळवले आहे. मात्र आता सीएनजीच्या दरात वाढ होत असल्याने नागरिक चिंतेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांची पावले लालपरीकडे म्हणजेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळू लागली आहेत.
नाशिकमध्ये गेल्या दीड महिन्यात सीएनजीच्या दरात १५ रुपयांनी वाढ झाली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये सीएनजीचा दर ७१ रुपये किलो होता. आणि आता हाच दर ८६ रुपयांवर पोहोचल्याने नाशिककरांकडून संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी सीएनजीचा दर ८३ रुपये होता मात्र, पुन्हा एकदा दर वाढल्याने नाशिककरांच्या खिशाला फटका बसणार असून, सध्या राज्यात सगळीकडेच महागाई वाढत आहे.
अतिरिक्त उसाचा प्रश्न कोणामुळे? शिल्लक उसाची खरी कारणे आली समोर...
दरम्यान, गॅसचे दरही वाढले असून गृहिणींचे मासिक नियोजन कोलमडले आहे. काही दिवसांपूर्वी घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजीच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. एलपीजी सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढली होती. एका सिलिंडरची किंमत १,००३ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा महिला गॅसपासून चुलीकडे वळताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
आताची सर्वात मोठी बातमी! पेट्रोल- डिझेल होणार स्वस्त, मोदी सरकारने थेट तारीखच सांगितली..
Share your comments