1. इतर बातम्या

7 pay commission: फिटमेंट फॅक्टरवर आज घेतला जाऊ शकतो मोठा निर्णय,किमान वेतन 26 हजार रुपये होण्याची शक्यता

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रदीर्घ काळाचे प्रतीक्षा आज संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार लवकरच मोठी बातमी देऊ शकते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
can today can take desion about fitment factor for central goverment employee wages

can today can take desion about fitment factor for central goverment employee wages

 केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रदीर्घ काळाचे प्रतीक्षा आज संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार लवकरच मोठी बातमी देऊ शकते.

मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची घोषणा करू शकते.  खरेतर फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी सरकारवर दबाव असून फिटमेंट फॅक्टर वाढविल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर वापरला जातो.केंद्र सरकारने जर फिटमेंट फॅक्टर वाढवला तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होईल.

 किती वाढेल वेतन?

 फिटमेंट फॅक्टर वाढवल्यानंतर किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपये आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याची मागणी केंद्र सरकारी कर्मचारी संघटनांनी फार काळापासून केली आहे. सध्याचा विचार केला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57 टक्के पगार मिळत आहे.

जर त्यामध्ये 3.68टक्के वाढ केली तर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात आठ हजार रुपयांची वाढ होईल. याचा अर्थ केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपये होईल.

 सर्व प्रकारच्या भत्त्यामध्ये होईल वाढ

 फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 टक्क्यांपर्यंत वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन सव्वीस हजार रुपये होईल. जर तुमचे पगार 18000 रुपये असेल तर भत्ते वगळून तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टर नुसार 46 हजार 260 रुपये ( 18000 ×2.57=46260) मिळतील.

जर आता फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर पगार 95 हजार 680 रुपये (26000×3.68=95680) होईल.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:IMD Alert: उत्तर भारतात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; येत्या 5 दिवसात 'या' ठिकाणी कोसळणार पाऊस

नक्की वाचा:तुमच्या कर्जाचा हप्ता वाढू शकतो! रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिले व्याजदर वाढवण्याचे संकेत

नक्की वाचा:Investment For Child: तुमची मुलं प्रौढ होईपर्यंत करोडपती करायचे असतील तर वापरा हे पर्याय, नक्कीच होईल फायदा

English Summary: can today can take desion about fitment factor for central goverment employee wages Published on: 25 May 2022, 08:44 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters