1. इतर बातम्या

7th pay commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 28 सप्टेंबरला मिळणार आनंदाची बातमी, पहा किती वाढणार पगार?

7th pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. कारण केंद्र सरकारकडून लवकरच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची घोषणा होऊ शकते. सप्टेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांची चांदी होऊ शकते. कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
7 th pay commission

7 th pay commission

7th pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central employees) लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. कारण केंद्र सरकारकडून (Central Goverment) लवकरच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात (DA) वाढ केली जाण्याची घोषणा होऊ शकते. सप्टेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांची चांदी होऊ शकते. कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे.

AICPI निर्देशांकाच्या जूनपर्यंतच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की त्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जाहीर केली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Union Cabinet Meetings) याची घोषणा केली जाऊ शकते. म्हणजेच सप्टेंबरच्या पगारात तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात.

थकबाकीही मिळेल

तुम्हाला सांगतो की कर्मचाऱ्यांचा नवीन महागाई भत्ता 1 जुलै 2022 पासून लागू होईल म्हणजेच तुम्हाला मागील 3 महिन्यांचे पैसे थकबाकी म्हणून मिळतील आणि ही रक्कम वाढीव DA सोबत तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल.

Today Horoscope: कुबेर ४ राशींच्या लोकांवर करणार धनाचा वर्षाव, या ३ राशींना मिळेल नोकरीत यश

38% DA मिळेल

कर्मचाऱ्यांचा DA अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर अवलंबून असतो. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते. यावर्षी, जुलै 2022 मध्ये, डीएमध्ये 4 टक्के वाढ होईल, त्यानंतर कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळेल.

Rain Alrt: राज्यातील या जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस कोसळणार! यलो अलर्ट जारी

मोजणीची पद्धत बदलली आहे

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने मोजणीचे सूत्र बदलले आहे. कामगार मंत्रालयाने महागाई भत्ता (DA गणना) साठी आधारभूत वर्ष 2016 बदलले आहे. मजुरी दर निर्देशांक (WRI-मजुरी दर निर्देशांक) ची नवीन मालिका प्रसिद्ध झाली आहे. कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की मूळ वर्ष 2016=100 असलेली WRI ची नवीन मालिका मूळ वर्ष 1963-65 च्या जुन्या मालिकेची जागा घेईल.

महत्वाच्या बातम्या:
पीएम किसान योजनेत केंद्राकडून मोठा बदल! या पाच कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे...
Gold Price: सोने खरेदीदारांचे नशीब चमकले! 10 ग्रॅम सोने खरेदी करा फक्त 30,000 रुपयांना...

English Summary: 7th pay commission: Good news for employees! Published on: 07 September 2022, 11:52 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters